Fruit Custard: उपवासासाठी कस्टर्ड पावडरशिवाय बनवा फ्रूट कस्टर्ड; जाणून घ्या सोपी रेसिपी

Shardiya Navratri 2024: जर तुम्ही नवरात्रीचे उपवास केले असतील तर तुम्ही फ्रूट कस्टर्ड बनवून खाऊ शकता. याची सोपी रेसिपी जाणून घ्या.

Updated: Oct 6, 2024, 04:27 PM IST
Fruit Custard: उपवासासाठी कस्टर्ड पावडरशिवाय बनवा फ्रूट कस्टर्ड; जाणून घ्या सोपी रेसिपी title=
Photo Credit: Freepik

Fruit Custard Recipe: नऊ दिवसांचा नवरात्री हा सण सुरु झाला आहे. हे नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांना समर्पित आहेत. या दिवसात भक्त उत्सवात देवीची मनोभावे पूजा करतात आणि उपवासही करतात. काही लोक नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात. तर काही भक्त संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात. जर तुम्हीही उपवास करत असाल तर या काळात तुम्ही ऊर्जेसाठी फळं खात राहणे गरजेचे आहे. फळं खाल्ल्याने तुमचं आरोग्यही ठीक राहील. नवरात्रीच्या उपवासात फ्रूट कस्टर्ड हा एक टेस्टी आणि पौष्टिक पर्याय असू शकतो. आम्ही तुम्हाला फ्रूट कस्टर्डची एक अतिशय सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात. 

लागणारे साहित्य 

दूध - १ लिटर
साखर - १/२ कप 
आवडीची फळे - १  कप 
व्हॅनिला एसेंस - १/२ टेबलस्पून

जाणून घ्या कृती 

  • एक मध्यम आकाराची कढई घ्या. त्यात दूध घाला आणि मध्यम आचेवर हळू छान गरम करा.
  • या दुधात थोडी साखर घाला आणि विरघळेपर्यंत ढवळत रहा.
  • आता एका वाटीमध्ये थोडं गरम दूध घेऊन त्यात केशर घाला.
  • हे केशर घातलेले दूध गॅसवर ठेवलेल्या दुधात घालून छान मंद आचेवर अशा प्रकारे शिजवा की त्याचा रंग डार्क होईल. 
  • आता त्यात उरलेली साखर घाला आणि आणखी शिजवा.
  • जोपर्यंत तो कस्टर्डचा छान रंग येत नाही तोपर्यंत शिजवा.
  • नंतर हे मिश्रण थंड होऊ द्यात आणि आता फ्रीजमध्ये ठेवा. 
  • थोड्यावेळाने हे मिश्रण फ्रिजमधून काढून त्यात चिरलेली फळे आणि व्हॅनिला इसेन्स घाला.
  • कस्टर्ड सर्व्ह करण्यासाठी, ग्लासेसमध्ये घाला आणि त्यावर चिरलेली ताजी फळे सजवा.
  • हे ग्लास फ्रिजमध्ये फ्रूट कस्टर्ड ठेवून थंड सर्व्ह करू शकता.
  • फ्रूट कस्टर्डसाठी तुम्ही सफरचंद, केळी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, डाळिंब अशी कोणत्याही प्रकारची फळ वापरू शकता. तुम्ही तुमच्या चवीनुसार फळे घालू शकता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x