Diabetic Diet Plan: मधुमेहाच्या रुग्णांसाठी शुगर नियंत्रणात राहणे खूप गरजेचे असते. शुगर वाढली की आरोग्यासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळं शुगर कमी होऊ नये आणि जास्त वाढू नये यासाठी औषधे वेळेवर घेणे गरजेचे आहे. मात्र अलीकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, टाइप-2 मधुमेहाने ग्रासलेल्या लोकांसाठी डॉ. मायकल मोसले यांनी तयार केलेला 5:2 डाएट प्लान औषधांपेक्षा जास्त फायदेशीर मानला गेला आहे. अशावेळी जर तुम्हाला औषधांशिवाय मधुमेह नियंत्रणांत ठेवायचा असेल तर या डाएट प्लान नक्की फॉलो करा. (How To Control Diabetes)
5.2 डाएट प्लान इंटरमिटेंट फास्टिंगसारखाच आहे. यात जवळपास पाच दिवस तुम्ही तुम्हाला हवं तस जेवण जेवू शकता. मात्र त्यानंतर सलग दोन दिवस कॅलरी 500-600 पर्यंत कमी करणे हे उद्दिष्ट्य ठेवायचे. या आहारामागचा सिद्धांत हा आहे की मर्यादित कॅलरीजसह एक दिवसानंतर शरीर चरबी जाळण्यासाठी अन्नातून निर्माण होणारी ऊर्जा वापरण्यास सुरवात करते.
जेएमएमए नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, या पद्धतीचे जेवणाची पद्धत कायम ठेवल्यास ग्लायसेमिक नियंत्रणात ठेवण्याबरोबरच लठ्ठपणा कमी होण्यासही मदत मिळते.
405 रुग्णांवर हा प्रयोग करण्यात आला आहे. त्यानंतर समोर आलं आहे की, 5:2 डाएट प्लान फॉलो केल्याने मेटफॉर्मिन आणि एम्पाग्लिफ्लोजिन तुलनेत जास्त ग्लायसेमिक कंट्रोल (ब्लड ग्लुकोज लेव्हल) असते. जे टाइप 2 डायबेटीजच्या रुग्णांसाठी औषध म्हणून अधिक चांगला पर्याय मानलं जाते.
तज्ज्ञांनी रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, 5:2 डाएटमध्ये फॉलो केल्यास मधुमेहाच्या रुग्णांसाठी तीन महिन्यात HbA1C ब्लड शुगर कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्याबरोबरच कबंर आणि मांड्यांची चरबीदेखील कमी झाल्याचे समोर आले.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)