Swollen Kidney Symptoms: किडनीला सूज आल्यास शरीर देईल 'हे' संकेत; Kidney Failure ची समस्या वेळीच टाळा

Swollen Kidney Symptoms: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची जीवनशैलीमुळे लोकांमध्ये किडनीशी संबंधित आजारांमध्ये वाढ होताना दिसतेय. यापैकी एक आजार म्हणजे किडनीला सूज येण्याची समस्या. याला मेडिकल टर्ममध्ये हायड्रोनेफ्रोसिस ( Hydronephrosis ) म्हणतात.

सुरभि जगदीश | Updated: Jul 21, 2024, 03:51 PM IST
Swollen Kidney Symptoms: किडनीला सूज आल्यास शरीर देईल 'हे' संकेत; Kidney Failure ची समस्या वेळीच टाळा title=

Swollen Kidney Symptoms: किडनी आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव मानला जातो. किडनी हा अवयव शरीरातील वीष आणि टॉक्सिक गोष्टी लघवीद्वारे बाहेर टाकते. किडनीने योग्यरित्या काम करणं थांबवलं अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. किडनीचं आरोग्य निरोगी ठेवणं फार आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची जीवनशैलीमुळे लोकांमध्ये किडनीशी संबंधित आजारांमध्ये वाढ होताना दिसतेय. यापैकी एक आजार म्हणजे किडनीला सूज येण्याची समस्या. याला मेडिकल टर्ममध्ये हायड्रोनेफ्रोसिस ( Hydronephrosis ) म्हणतात.

या स्थितीत मूत्र नलिकेमध्ये अडथळा निर्माण होतो. परिणामी मूत्र मूत्रपिंडातून बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे एक किंवा दोन्ही मूत्रपिंडांना सूज येण्याची शक्यता अधिक असते. यावर वेळीच उपचार न केल्यास किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. जेव्हा मूत्रपिंडात सूज येते त्यावेळी शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसून येतात. ही लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार केल्यास किडनी खराब होण्यापासून वाचवता येते. जाणून घेऊया किडनीमध्ये सूज येण्यापूर्वी कोणते संकेत दिसून येतात.

लघवी करण्यामध्ये समस्या

मूत्रपिंडाचा संबंध थेट लघवीशी असतो. अशा वेळी किडनीला सूज आल्याने लघवीशी संबंधित बदल दिसू शकतात. यावेळी वारंवार लघवी होणं, लघवीमध्ये फेस दिसून येणं, लघवीद्वार रक्त येणं, लघवीचा रंग आणि वास बदलणे ही लक्षणं मूत्रपिंडात सूज येण्याची चिन्हे असू शकतात.

पाय आणि घोट्यात सूज येणे

पाय आणि घोट्याला सूज येणं हे देखील किडनीला सूज येण्याचं लक्षणं असण्याची शक्यता आहे. जेव्हा किडनी शरीरातील टॉक्सिक पदार्थ पूर्णपणे फिल्टर करू शकत नाहीत, तेव्हा हे पदार्थ शरीरात जमा होऊ लागतात. त्यामुळे पाय आणि घोट्याला सूज येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे चेहरा आणि डोळ्याभोवती सूज येऊ शकते. 

श्वास घेण्यास त्रास होणं

किडनी सूज आली असल्यास एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता अधिक असते. किडनीला सूज आल्याने शरीरात जास्त प्रमाणात द्रव साचू शकतं. ज्यामुळे फुफ्फुसांवर दबाव वाढतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 

कंबरदुखी

जर तुम्हाला वारंवार कंबरेच्या खालच्या भागात वेदना जाणवत असतील तर ते किडनीला सूज येण्याचं लक्षण असू शकतं. जेव्हा किडनीमध्ये सूज येते तेव्हा किडनीभोवती भार वाढतो, ज्यामुळे तुम्हाला कंबरेत दुखण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

उलट्यांसोबत मळमळ होणं

ज्यावेळी किडनीला सूज येते तेव्हा तेव्हा उलट्या आणि मळमळ यांसारखी लक्षणंही जाणवू शकतात. हे शरीरात टॉक्सिक पदार्थ जमा झाल्यामुळे होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला अशा प्रकारची लक्षणं दिसून येत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)