Homemade Rice Flour Soap Recipe: आपण चेहऱ्याची खूप काळजी घेतो. आठवड्यातून एकदा चेहऱ्याला फेस मास्क, क्लिनअप यासारखे सोपस्कार पार पडतो. पण त्याच बरोबर त्वचेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. प्रदूषणामुळं हात-पाय टॅन होतात. हे टॅन घालवण्यासाठी वेगवेगळे सौंदर्यप्रसाधन वापरतात. पण यातील रासायनिक घटकांमुळं त्वचेचे नुकसान होते. तसंच, त्वचेवरील मळही नीट जात नाही. त्याचसाठी आज आम्ही तुम्हाला घरातल्या घरात एक आयुर्वैदिक साबण कसा बनवायचा याची माहिती देणार आहोत.
घरातच तांदळाचे पीठ वापर साबम कसा तयार करायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या साबणामुळं तुमच्या त्वचेला पोषण तर मिळेलच पण एक नैसर्गिक स्क्रब म्हणूनही हा साबण तुम्ही वापरु शकता. यामुळं त्वचेवरील डेडस्कीन दूर होण्यास मदत होते. तसंच, त्वचा तजेलदार तर होतेच पण त्वचेला चमकदेखील येते. पाहूया हा साबण कसा बनवायचा याची रेसिपी काय?
अलीकडेच चेहऱ्यासाठी तांदळाचा फेसपॅक लावण्याचा ट्रेंड आला आहे. या फेसपॅकमुळं चेहऱ्यावरील टॅन दूर होण्यास मदत मिळते. तसंच, तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेवरील वृद्धत्वाच्या खुणा कमी होतात. त्याचप्रमाणे तांदळाचा साबण त्वचा तजेलदार ठेवतो तसंच, डेड स्कीन हटवतो. तांदळाच्या पीठात व्हिटॅमीन आणि खनिज असतात जे त्वचेला पोषण देतात.
लाल मसूर डाळ- 1 कप
मुलतानी माती-1 कप
तांदळाचे पीठ- 1 कप
मध- 1चमचा
गुलाबपामी-4-5 चमचे
व्हिटॅमिन ई कॅप्सूल-2
सोप बेस- 1 वाटी
सोप ट्रे
सगळ्यात पहिले मसूर डाळ मिक्सरमध्ये टाकून बारीक दळून घ्या. आता एका मोठ्या भांड्यात 2 चमचे मसूर डाळ, मुलतानी माती, तांदळाचे पीठ, मध आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल टाकून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्या.
आता एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करुन ठेवा. एका बाऊलमध्ये सोप बेसचे तुकडे घ्या व हे भांडे गरम पाण्याच्या भांड्यावर ठेवून द्या. त्यानंतर सोप बेस वितळायला लागला की त्यात आधी एकत्र केलेले सर्व जिन्नस टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्या. आता हे तयार झालेले सोप बॅटप सोप ट्रेमध्ये टाका. एक दिवसासाठी हे मिश्रण तयार होण्यासाठी ठेवा.
दुसऱ्या दिवसापासून तुम्ही हा साबण आंघोळीसाठी वापरू शकता. तुम्हाला हवं तर फेसवॉश म्हणूनही त्याचा वापर करु शकता.