वॉशिंग मशीनमध्ये टाका 'ही' पेन किलर, पांढरे कपडे नव्यासारखे चमकतील

How To Use Aspirin To Whiten Clothes: कपडे स्वच्छ निघण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये महागडी पावडर वापरण्यात येते. मात्र तुम्ही तुम्हाला एक जबदरस्त जुगाड सांगणार आहोत. यामुळं तुमचे सफेद कपडे लख्ख चमकतील. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 8, 2024, 01:16 PM IST
वॉशिंग मशीनमध्ये टाका 'ही' पेन किलर, पांढरे कपडे नव्यासारखे चमकतील title=
pain killer in washing machine whiten clothes like new here is how to use in marathi

How To Use Aspirin To Whiten Clothes: समस्त गृहिणींची नेहमीच एक तक्रार असते ती म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये सफेद कपडे नीट धुतले जात नाहीत. मग अशावेळी गृहिणी हाताने कपडे धुतात. पण ऑफिसच्या जाणाऱ्या महिलांना मात्र नेहमी हाताने कपडे धुणे जमत नाहीत. अशावेळी लाँड्रीमध्ये कपडे धुण्यासाठी द्यावे लागतात. नाहीतर कपडे चांगले निघावे यासाठी महागड्या डिटर्जेंटचा वापर केला जातो. पण आज म्ही तुम्हाला एक टिप्स सांगणार आहोत. या टिप्समुळं तुम्हाला महागडी पावडर पण वापरावी लागणार नाही आणि मेहनतही घ्यावी लागणार नाही. या ट्रिकमुळं कपडे कितीही मळलेले असू द्या ते स्वच्छ होणारच. 

सफेद कपड्यांसाठी खूप जास्त साबण लावावा लागतो. किंवा मग वॉशिग मशीनऐवजी हातानेच कपडे धुवावे लागतात. पण तरीही रिझल्ट काही चांगला येत नाही. त्यामुळंच आम्ही तुम्हाला एक जुगाड सांगणार आहोत. प्रत्येकाच्या घरात तर पेन किलर असतातच. अंगदुखी किंवा डोके दुखी झाल्यास पेन किलरचा वापर केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला पेन किलरचा वापर स्वच्छ कपडे धुण्यासाठी कसा केला जाऊ शकतो, हे सांगणार आहोत. 

पेन किलरचा वापर कपडे स्वच्छ करण्यासाठी केला जाऊ शकतो. एस्पिरिन या पेन किलरचा वापर तुम्ही कपडे धुण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला 5 एस्पिरीन टॅबलेटची गरज भासणार आहे. कारण एक टॅबलेट 325 मिलीग्रामची असते. टॅबलेटचा वापर करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्या आणि एस्पिरीनच्या गोळ्यात त्यात टाका. जोपर्यंत टॅबलेट पूर्ण विरघळणार नाही तोपर्यंत ते मिक्स करत राहा. टॅबलेट पूर्णपणे विरघळल्यानंतर ते मिश्रण वॉशिंग मशीनमध्ये टाका. ज्यात तुम्ही सफेद कपडे टाकले आहेत. पण एक लक्षात घ्या की, सफेद कपडे धुण्यासाठी भिजत ठेवल्यानंतर त्यात हे मिश्रण तुम्ही टाकू शकता. साधारण आठ तास तुम्ही या पाण्यात कपडे ठेवले तर रिझल्ट चांगला येतो. 

साध्या पाण्याच्या तुलनेत अॅस्परिनच्या पाण्याने कपडे धुतल्यानंतर रिझल्ट चांगला येतो. पण ब्लीच इतके ते प्रभावी नसते.