Research : वयानुसार आठवड्यातून किती वेळा शारीरिक संबंध ठेवावे?

लग्न आणि त्यानंतर नातंवड यावर आपण मनमोकळ्या आणि खुलेआम गप्पा मारतो. पण शारीरिक संबंध आणि त्याबद्दलची समस्या असो किंवा गैरसमज याबद्दल आजही बोललं जातं नाही.  

नेहा चौधरी | Updated: Dec 13, 2024, 10:28 PM IST
Research : वयानुसार आठवड्यातून किती वेळा शारीरिक संबंध ठेवावे?  title=
Relationship Tips

Physical Relationship Research : आपण प्रत्येक जण आपल्या शरीर आणि मनाच्या आरोग्याची काळजी घेतो. आज शाळेतून लहान मुलांना गूड टच आणि बॅड टचची शिकवण दिली जाते. पण आजही प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक संबंधांबद्दल हवी तशी जनजागृती करण्यात येत नाही. त्याबद्दल आजही मनमोकळेपणे बोललं जातं नाही. त्यामुळे आजही लग्नानंतर अनेक जोडपी शारीरिक संबंधातील गैरसमजामुळे अंसतुष्ट आणि असमाधानी आहेत. 

आजही जोडपी अनेक प्रश्नांची उत्तर ही गुगलवर सर्च करुन शोधत असतात. फारच कमी जोडपी ही Soxologist कडे जातात. सर्वसामान्यांना पडणारा एक प्रश्न असतो तो म्हणजे आठवड्यातून किती वेळा शारीरिक संबंध ठेवल्यास तुमचं लैंगिक आयुष्य हे हेल्दी आणि आनंदी असेल. तर या प्रश्नाचं उत्तर भारतातील सर्वोत्तम सेक्सोलॉजिस्ट डॉ. कल्पना एरंडे आणि डॉ. संजय एरंडे यांनी दिली आहे. 

वयानुसार आठवड्यातून किती वेळा शारीरिक संबंध ठेवणे योग्य? 

पंचवीस ते पस्तीत वयात आठवड्यातून किमान तीनदा ते चारदा शारीरिक संबंध ठेवावे. पस्तीस ते पंचेचाळीस या वयात किमान दोनदा ते तीनदा व्हायला पाहिजे. पंचेचाळीस ते पंचावन्नमध्ये किमान एकदा ते दोनदा शारीरिक संबंध ठेवलं पाहिजे. तर पंचावन्न आणि त्याच्यापुढं आठवड्याला किमान एकदा व्हायला पाहिजे. 

डॉ. संजय एरंडे हे म्हणाले की, त्यांच्याकडे एक जोडप येतं, ते नवऱ्याचं वय अठ्ठातर आणि बायकोचं शहात्तर आहे. हे जोडपे आठवड्यातून एका शारीरिक संबंध ठेवतात. कारण त्यांनी त्यांचं लैंगिक आयुष्यात सात्यतपूर्ण ठेवलंय. तुम्ही जर त्या प्रोसेसमध्ये नाही राहिल्यात, तर तुम्ही लैंगिक आयुष्यात सात्यत नाही ठेवलं तर, तुमच्या लैंगिक आयुष्य वयाच्या 30 व्या वर्षी बंद होऊ शकतं. 

व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक करा

दरम्यान तुम्ही सेक्सोलॉजिस्ट डॉ. कल्पना एरंडे आणि डॉ. संजय एरंडे यांची ही बातचीत कटींग पे मिटिंग मराठी Podcast वर पाहू शकता. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)