Rohit Sharma ने लेकीचं ठेवलंय अतिशय ट्रेंडी नाव, मुलींच्या युनिक नावांची यादी

Rohit Sharma Daughter Name : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या लेकीच नाव अतिशय युनिक. अर्थ जो प्रत्येकालाच आवडेल. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 12, 2023, 12:19 PM IST
Rohit Sharma ने लेकीचं ठेवलंय अतिशय ट्रेंडी नाव, मुलींच्या युनिक नावांची यादी title=

Rohit Sharma भारतीय संघाचा कर्णधार रोहत शर्माने वर्ल्ड कप 2023मध्ये IND vs AFG या सामन्यात अर्धशतक करून रेकॉर्ड केला आहे. भारतीय संघाचा हा दुसरा दणदणीत विजय ठरला. या सामन्यानंतर रोहित शर्माची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. 

रोहित शर्माचा खेळ जसा जबरदस्त आणि हटके असतो अगदी तसंच त्याने आपल्या लेकीला युनिक नाव दिलं आहे. या ट्रेंडी नावाचा तुम्ही देखील विचार करू शकता. रोहित शर्माच्या मुलीचे नाव आणि त्याच्या अर्थासह इतर मुलींची युनिक नावे आपण पाहणार आहोत. 

लेकीचा जन्म

रोहित शर्माच्या लेकीचा जन्म 30 डिसेंबर 2018 मध्ये झाला आहे. रोहित शर्मा आणि त्याची पत्नी ऋतिकाने लेकीला अतिशय युनिक आणि गोड नाव दिलं आहे. लेकीच्या नावाबाबत हे दोघं अतिशय उत्सुक होते. तुम्ही देखील हे नाव वाचून आमच्या मताशी सहमत व्हाल. या लेखात मुलींच्या युनिक नावांची यादी आणि त्याचे अर्थ पाहणार आहोत. 

रोहितच्या लेकीचे नाव आणि अर्थ

रोहित आणि ऋतिकाने लेकीचं नाव 'समायरा' असं ठेवलं आहे. 'समायरा' या नावाचा अर्थ आहे आराधना, जप करणे, ईश्वराची पूजा करणे. या अर्थाचा परिणाम या नावाच्या मुलींवर होतो. त्यामुळे 'समायरा' हे नाव अतिशय युनिक आहे. 

मुलींची युनिक नावे आणि अर्थ 

ईशान्वी - 'ईशान्वी' हे नाव देवी पार्वतीचं नाव आहे. देवी पार्वतीचे नाव असल्याचे लोकप्रिय मानले जाते, परंतु या अर्थाचे मूळ अस्पष्ट आहे. कदाचित हे "ईशानी" नावावरून आले आहे जे देवी पार्वतीला देवी दुर्गेच्या रूपात सूचित करते.

विरण्या - 'विरण्या' हे नाव देखील अतिशय युनिक आहे. या नावाचा अर्थ आहे घनदाट जंगल. विरण्या या नावाचा शुभांक 8 आहे. विरण्या नावाच्या मुली या यशाभिमुख, कल्पक, प्रभावशाली, सहनशील, मैत्रीपूर्ण, अध्यात्मिक, सर्जनशील, भावपूर्ण, मानवतावादी, उपयुक्त, आत्मत्यागी, आदर्शवादी, देणगी, परोपकारी, समर्पित आणि रोमँटिक अशा गुणांनी संपन्न असतात. 

रिषिता - 'रिषिता' या नावाचा अर्थ आहे सर्वोत्कृष्ट, संत, विद्वान, संतांपैकी एक, दैवी उपासक, ऋषी नावाचे भिन्न रूप. या नावाचा शुभांक 3 असा आहे. 

युथिका - 'युथिका' हे संस्कृत नाव आहे. या नावाचा अर्थ आहे पांढरे जास्मिनचे फूल. युथिकाचा अर्थ बहुसंख्य, फूल. युथिका हे लहान मुलीचे नाव असून ते मूळचे भारतीय वंशांचे आहे.

दिव्याना - 'दिव्याना' हे अतिशय डिव्हाईन नाव आहे. यामुळे तुमच्या मुलीवर परमेश्वराची खास कृपादृष्टी राहील. दैवी, एक प्रेमळ आणि दैवी अस्तित्व, ज्वलंत असा या नावाचा अर्थ आहे.