जागतिक महिला दिन आणि जांभळ्या रंगाचं काय आहे कनेक्शन?

Womens Day and Purple Color Connection: 'जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जातो. महिला आणि गुलाबी रंग हे समीकरण असताना.. महिला दिनाच्या दिवशी जांभळ्या रंगाचं काय कनेक्शन?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 7, 2024, 04:52 PM IST
जागतिक महिला दिन आणि जांभळ्या रंगाचं काय आहे कनेक्शन? title=

Womens Day and Purple Color Connection: 8 मार्च हा दिवस जगभरात 'महिला दिन' म्हणून साजरा केला जातो. क्लारा झेटकिन या महिला अधिकारी कार्यकर्त्याने 1910 मध्ये 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'ची सुरुवात केली. पहिला 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' 1911 मध्ये ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये साजरा करण्यात आला. 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'ची ओळख जांभळ्या रंगाने केली जाते. जांभळ्या रंगाचा या दिवसाशी काय संबंध आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

गुलाबी रंग आणि महिला यांचा संबंध असल्याचं अनेक उदाहरणावरून स्पष्ट होतं. मुलींसाठी गुलाबी रंग आणि मुलांसाठी निळा रंग वापरला जातो, हे समाजाने अगदी सहज स्वीकारलं आहे.  परंतु दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात साजरा होणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय महिला दिनी' जांभळा रंगाचे कपडे का परिधान केला जातात. महिला दिनाचा आणि जांभळ्या रंगाचा काय संबंध?

(हे पण वाचा - Womens Day : चाळीशी ओलांडलेल्या महिलांना उतारवयातील सौंदर्यासाठी मदत करेल प्लांट प्रोटीन, कसं ते समजून घ्या) 

जांभळ्या रंगाचा अर्थ

जांभळा रंग हा न्याय आणि सन्मानाचे प्रतिक आहे. महिला दिनी जांभळा परिधान केल्याने जगभरातील महिलांशी एकजुटीची भावना दिसून येते.

आशेने भरलेला हिरवा

'जागतिक महिला दिवस' साजरा करण्याशी संबंधित हिरवा रंग सकारात्मकता आणि आशेचे प्रतीक आहे. हिरवा रंग देखील आनंदाशी संबंधित आहे. हिरवा रंग देखील उपचाराशी संबंधित आहे. हिरवा देखील समानता आणि सामर्थ्य दर्शवणारा रंग आहे. महिला दिनाच्या मोहिमेशी संबंधित हिरवा रंग प्रत्यक्षात महिलांच्या उत्साही व्यक्तिमत्त्वाशी संबंधित आहे.

पांढरा रंग पवित्रता आणि शांतता दर्शवतो

पांढरा रंग पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. पांढरा रंग यशस्वी सुरुवात दर्शवितो. याशिवाय, हा रंग शांतता आणि दृढनिश्चय देखील दर्शवितो. जगभरात शांतता आणि सौहार्द राखण्यात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच हा रंगही या सणाचा एक खास भाग आहे.

सुरुवात कोणी केली?

क्लारा झेटकिन या महिला अधिकारी कार्यकर्त्याने 1910 मध्ये 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'ची पायाभरणी केली. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे झालेल्या वर्किंग वुमनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तिने हे सुचवले होते. कोपनहेगन येथे झालेल्या परिषदेत 17 देशांतील 100 महिलांनी भाग घेतला आणि क्लारा झेटकिन यांच्या या सूचनेला त्यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर 1911 मध्ये ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.