LIVE Himachal Pradesh Election Result 2022 | काँग्रेस 38, भाजपला 27 जागा

 LIVE | Himachal Pradesh Election Result 2022 : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा, काँग्रेस 38 तर भाजप 27 जागांवर आघाडीवर

LIVE Himachal Pradesh Election Result 2022 | काँग्रेस 38, भाजपला 27 जागा

Himachal Pradesh Assembly Election Result Live Updates: हिमाचल प्रदेश विधानसभेत काँग्रेसने बहुमताचा आकडा केला पार

 

8 Dec 2022, 07:44 वाजता

Himachal Pradesh Election Result 2022 Live : हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची पक्नी आणि हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्या प्रतिभा सिंह यांनी काही सूचक वक्तव्य केली. तर तिथे मंडीमध्ये मतमोजणीच्या आधीची दृश्य लक्ष वेधणारी ठरली. 

8 Dec 2022, 07:33 वाजता

Himachal Pradesh Election Result 2022 Live : हिमाचल सरकारमध्ये एक प्रथा वर्षानुवर्षांपासून पाहायला मिळत आहे, की इथं दर पाच वर्षांनी सरकार बदलत आहे. यावेळी भाजपचं हेच लक्ष्य राहणार असून या राज्यात आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एककेंद्री असेल. 

8 Dec 2022, 07:11 वाजता

 

Himachal Pradesh Assembly Election Result 2022 Live : हिमाचल प्रदेशातील निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी सध्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर बुधवारी शिमला येथील रिज भागामध्ये गोलगप्पे खाताना दिसले. सोशल मीडियावर याची बरीच चर्चा झाली.

8 Dec 2022, 07:01 वाजता

Himachal Pradesh Assembly Election Result 2022 Live : हिमाचल प्रदेशमध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होताच सर्वप्रथनम पोस्टल बॅलेटमधील मतमोजणी केली जाणार आहे. ज्यानंतर ईव्हीएम मशिनच्या मतांची मोजणी सुरु होईल.