LIVE Himachal Pradesh Election Result 2022 | काँग्रेस 38, भाजपला 27 जागा

 LIVE | Himachal Pradesh Election Result 2022 : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा, काँग्रेस 38 तर भाजप 27 जागांवर आघाडीवर

LIVE Himachal Pradesh Election Result 2022 | काँग्रेस 38, भाजपला 27 जागा

Himachal Pradesh Assembly Election Result Live Updates: हिमाचल प्रदेश विधानसभेत काँग्रेसने बहुमताचा आकडा केला पार

 

8 Dec 2022, 09:29 वाजता

हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - भाजप पुन्हा आघाडीवर 34 जागांवर पुढे, तर काँग्रेस 31 जागांवर आघाडीवर, अपक्ष 3 जागांवर आघाडी

8 Dec 2022, 09:24 वाजता

हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - 9.30 वाजेपर्यंत काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 30 जागांवर आघाडी, आपला अद्याप खातंही उघडता आलं नाही, तर अपक्ष 1 जागेवर पुढे

8 Dec 2022, 09:20 वाजता

हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - काँग्रेस पुन्हा आघाडीवर 35 जागा, तर भाजप 31 जागांवर आघाडी

8 Dec 2022, 09:03 वाजता

हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - रामपूर मतदारसंघात काँग्रेसचे नंदलाल तर बल्ह मतदार संघात काँग्रेसचे प्रकाश चौधरी आघाडीवर, अनुसार सुलह मतदारसंघातून विपिन परमार आघाडीवर, विपिन परमार विधानसभा स्पीकर होते

8 Dec 2022, 08:46 वाजता

हिमाचलप्रदेश विधानसभा - चम्बा आणि डलहौसी मतदार संघात भाजपचे उमेदवार आघाडीवर, तर भट्टीयात आणि फतेपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर

8 Dec 2022, 08:40 वाजता

हिमाचल प्रदेश विधानसभा - भाजप 36 जागांसह पुन्हा आघाडीवर, तर काँग्रेस 32 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर

हिमाचलमध्ये आपला अद्याप खातं उघडता आलेलं नाही

8 Dec 2022, 08:32 वाजता

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक -  काँग्रेस 33 जागांवर आघाडी तर भाजप 27 जागांवर आघाडी

हिमाचलमध्ये आपला अद्याप खातंही उघडता आलेलं नाही

8 Dec 2022, 08:27 वाजता

हिमाचल प्रदेश विधानसभा - भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस

भाजप 18 तर काँग्रेस 18 जागांवर आघाडीवर

8 Dec 2022, 08:20 वाजता

हिमाचल विधानसभा निवडणक - काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर, भाजप 8 जागांवर आघाडी

8 Dec 2022, 08:13 वाजता

हिमाचल प्रदेश विधानसभा - भाजप 4 जागांवर तर काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर