Live निकाल अपडेट : जिल्हा परिषदेचा रणसंग्राम

जिल्हा परिषदेचा रणसंग्राम 

Live निकाल अपडेट : जिल्हा परिषदेचा रणसंग्राम

Live निकाल अपडेट : जिल्हा परिषदेचा रणसंग्राम 

23 Feb 2017, 15:00 वाजता

नांदेड : येवती गटातून काँग्रेसच्या शंकुतला विनायक कोलमवाड या 5618 मतानी विजयी 

23 Feb 2017, 14:58 वाजता

पुणे : पुरंदरमध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय... जिल्हा परिषदेच्या 4 पैंकी 3 जागांवर शिवसेना तर एका जागेवर काँग्रेस... पंचायत समितीच्या 8 पैंकी 6 जागांवर शिवसेना विजयी... २ जागांवर काँग्रस विजयी

23 Feb 2017, 14:53 वाजता

सांगली : बागणीमधून अपक्ष संभाजी कचरे 120 मतांनी विजयी... रयत विकास आघाडीचे सागर सदाभाऊ खोत पराभूत

23 Feb 2017, 14:53 वाजता

सातारा : राष्ट्रवादीचे आमदार प्रभाकर घार्गे यांच्या पत्नी इंदिरा घार्गे पराभूत... काँग्रेस नेते धैर्यशील कदमांच्या पत्नी सुनीता कदम यांनी केला पराभव... इंदिरा या खटावचे माजी आमदार कै. केशवराव पाटलांच्या कन्या 

23 Feb 2017, 14:52 वाजता

पुणे : जिल्हा परीषद निवडणुकीत महानंदा डेअरीच्या माजी अध्यक्ष वैशाली नागवडे यांचा पराभव... राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

23 Feb 2017, 14:51 वाजता

लातूर : काँग्रेसच्या गडाला भाजपचा सुरुंग, जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत... 30 जागा जिंकून भाजपची आघाडी

23 Feb 2017, 14:50 वाजता

इंदापूर : बावडा - लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील विजयी... रत्नप्रभादेवी पाटील या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री

23 Feb 2017, 14:49 वाजता

नांदेड : कलंबर गटातून काँग्रेसच्या मालनबाई भुजबळ विजयी

23 Feb 2017, 14:49 वाजता

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या एकूण 55 पैंकी 39 जागांवर शिवसेना आणि 15 जागांवर राष्ट्रवादी विजयी

23 Feb 2017, 14:48 वाजता

हिंगोली : वसमत तालुक्यात शिवसेनेला धक्का... जिल्हा परिषद गटाच्या 12 पैंकी 6 जागा भाजपकडे तर 6 राष्ट्रवादीकडे ... पंचायत समिती भाजपच्या एकहाती ताब्यात... सेनेचे आमदार जयप्रकाश मुंदडा यांना दणका