Live निकाल अपडेट : जिल्हा परिषदेचा रणसंग्राम

जिल्हा परिषदेचा रणसंग्राम 

Live निकाल अपडेट : जिल्हा परिषदेचा रणसंग्राम

Live निकाल अपडेट : जिल्हा परिषदेचा रणसंग्राम 

23 Feb 2017, 13:02 वाजता

सांगली : माजीमंत्री पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड (काँग्रेस) पराभूत... कुंडलमधून राष्ट्रवादीचे शरद लाड विजयी, शरद लाड हे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे जावई

 

23 Feb 2017, 13:01 वाजता

सातारा : राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधु ऋषीकांत शिंदे यांचा पराभव... कुडाळ जिप गटातून भाजपाचे दीपक पवार यांनी केला पराभव

 

23 Feb 2017, 13:01 वाजता

जालना : रोहिलागड गटातून काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे पराभूत, भाजपचे तालुकाध्यक्ष अवधूत खड़के विजयी

23 Feb 2017, 12:57 वाजता

जालना : परतुरमधील आष्टी गटातून भाजपचे राहुल लोनिकर विजयी.. राष्ट्रवादीच्या बळीराम कडपेंना केलं चारी मुंडया चित, राहुल लोनीकर मंत्री बबनराव लोनिकर यांचे सुपुत्र... राहुल लोनिकर 5 हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी

23 Feb 2017, 12:34 वाजता

शिरूर : टाकळी हाजी पंचायत गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरूणाताई दामू घोडे 4 हजार 542 मतांनी विजयी

 

23 Feb 2017, 12:34 वाजता

शिरूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जगदाळे यांनी भाजपचे राहूल पाचर्णे यांचा 2340 मतांनी केला पराभव... शिरूर तालुक्यात भाजपला जोरदार धक्का... आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या मुलाचा झाला पराभव...  

23 Feb 2017, 12:32 वाजता

सांगली : शिराळा तालुक्यात 4 पैंकी 2 राष्ट्रवादी तर 2 जागेवर काँग्रेस विजयी... भाजपा सुपडासाफ... भाजपा आमदार शिवाजीराव नाईक यांना धक्का

23 Feb 2017, 12:32 वाजता

औरंगाबाद : कन्नड, हतनूर जिल्हा परिषद गटात मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार 300 मतांनी पिछाडीवर

23 Feb 2017, 12:29 वाजता

सांगली : कोकरुड मधून काँग्रेसचे सत्यजित देशमुख विजयी

23 Feb 2017, 12:23 वाजता

जिल्हा परिषद गट : सेना - 24 जागांवर विजयी, संगमेश्वर 7 पैंकी 7, रत्नागिरी 10 पैंकी 10, लांजा 4 पैंकी 4, दापोली 1, चिपळूण 2, राष्ट्रवादी 2