21 Dec 2022, 20:56 वाजता
कोरोना पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अॅक्शन मोडवर
Corona Alert | Marathi News LIVE Today : केंद्र सरकारकडून सावधगिरीच्या मार्गदर्शक सूचना, केंद्र सरकारने जारी केली अलर्ट नोटीस. शाळा, कॉलेज विद्यापीठांना अलर्ट नोटीस जारी. 'गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा', केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या सूचना, अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश.
न्युमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी करा. लक्षण असल्यास कोरोना टेस्ट करा. ख्रिस्मस, न्यू ईयर सेलिब्रेशनआधी नियम लागू ? कोरोना अजून संपलेला नाही, असं सांगत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाच्या सूचना केल्यायत.
बातमी पाहा - https://bit.ly/3jlY3QX
21 Dec 2022, 18:16 वाजता
खासदार नवनीत राणा यांना दिलासा नाहीच
Navneet Rana | Maharashtra Political News : जातपडताळणी प्रकरणी नवनीत राणा (Navneet Rana) यांना दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयानं राणा यांचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळलाय. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात 2014 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवडी कोर्टानं राणा यांचं डिस्चार्ज अॅप्लिकेशन फेटाळलं होतं. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे वडील यांनी सत्र न्यायालयात दोषमुक्ततेसाठी अर्ज केला होता. तो कोर्टानं फेटाळलाय.
बातमी पाहा - https://bit.ly/3PHsjSq
21 Dec 2022, 17:19 वाजता
राहुल शेवाळेंचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
Rahul Shevale | Maharashtra Political News : सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणात खासदार राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray)गंभीर आरोप केलेत... रिया चक्रवर्तीला AU नावानं 44 फोन आले होते. AU म्हणजे आदित्य उद्धव अशी माहिती बिहार पोलिसांच्या रिपोर्टमध्ये असल्याचा सनसनाटी गौप्यस्फोट शेवाळेंनी लोकसभेत बोलताना केला. AU म्हणजे अनन्या उदास असा उल्लेख मुंबई पोलिसांच्या रिपोर्टमध्ये आहे. बिहार आणि मुंबई पोलिसांच्या रिपोर्टबाबत योग्य खुलासा व्हावा, अशी मागणीही शेवाळेंनी यावेळी केली.
बातमी पाहा - रिया चक्रवर्तीला A U नावानं 44 फोन, AU म्हणजे... राहुल शेवाळेंचा सनसनाटी गौप्यस्फोट
21 Dec 2022, 13:51 वाजता
'शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन'
Shahrukh Khan : शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन अशी वादग्रस्त धमकी देण्यात आलीय. अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी ही वादग्रस्त धमकी दिलीय. पठाण सिनेमातल्या दीपिकाच्या भगव्या बिकिनीचा वाद काही थांबताना दिसत नाही. या सिनेमातल्या बेशरम रंग गाण्यात दीपिकाने भगवी बिकीनी घालत भगव्या रंगाचा अपमान केल्याचा आरोप आहे. आता परमहंस आचार्य यांनी शाहरुख खानलाच धमकी दिलीय. आज आम्ही शाहरुख खानचे पोस्टर जाळले. जर मला जिहादी शाहरुख खान मिळाला तर मी त्याला जिवंत जाळून टाकेन अशी वादग्रस्त धमकी परमहंस यांनी दिलीय.
बातमी पाहा- अयोध्याच्या आचार्यांनी दिली शाहरुख खानला धमकी
21 Dec 2022, 13:08 वाजता
देशात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती लागू होण्याची शक्यता
India Corona Virus : देशात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती लागू होण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे. सार्वजनिक ठिकाणांसह रेल्वे प्रवासातही मास्क सक्ती लागू होण्याची शक्यता आहे. चीन जपान अमेरिकेत कोरोना संकट पुन्हा वाढतंय. त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत मॅरेथॉन बैठक सुरू आहे. त्यात मास्क सक्तीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. ख्रिसमस आणि नवं वर्ष स्वागत लक्षात घेता ही नियमावली लागू होण्याची शक्यता आहे.
बातमी पाहा- पुन्हा बंधनं, पुन्हा मास्कसक्ती? कोरोना उद्रेकानंतर देशाची आरोग्य यंत्रणा अलर्टवर
21 Dec 2022, 12:25 वाजता
एलॉन मस्क ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार?
Elon Musk Will Resign | World News : एलॉन मस्क ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार का अशी चर्चा आता रंगतेय. कारण आहे मस्क यांनी केलेलं एक ट्विट. एलॉन मस्क यांनी 19 डिसेंबर रोजी पहाटे 4.50 वाजता एक ट्विट केलं, ज्यानं जगभरात खळबळ माजली. ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का, तुम्ही सांगाल तसं मी करेन असं ट्विट मस्क यांनी केलंय. या ट्विटवर लोकांना मतदान करण्याचं आवाहनही करण्यात आलं. सुमारे 1 लाख 30 हजार लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केलं. तर एक कोटींहून अधिक लोकांनी मतदान केलं.. 57.5 टक्के लोकांनी मस्क यांनी राजीनामा द्यावा असं मत दिलंय. त्यानंतर मस्क यांनी आज सकाळी पुन्हा ट्विट केलं. ट्विटरच्या CEO पदाची जबाबदारी घेणारी कुणी मूर्ख व्यक्ती मला सापडली, की मी लगेच या पदावरून पायउतार होईन. असं मस्क यांनी म्हटलं आहे.
21 Dec 2022, 12:17 वाजता
वीज ग्राहकांवर बेस्टचा भार
Best Electricity Bill | Marathi News LIVE Today : मुंबईकरांना बेस्टनं धक्का दिलाय. बेस्टच्या विद्युत विभागानं ग्राहकांना दोन महिन्याच्या बिलाची अनामत रक्कम भरण्याचं पत्र पाठवलंय. 26 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना ही रक्कम भरावी लागणार आहे. सुरक्षा अनामत रक्कम ही नवीन वीज जोडणीच्या वेळी घेतली जाते. मात्र बेस्टने दोन महिन्यांच्या मासिक वीज बिलाची अतिरिक्त अनामत रक्कम घेण्याचा निर्णय घेतल्यानं ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या निर्णयाचा 10 लाख ग्राहकांना फटका बसणार आहे. हा निर्णय बेस्टनं मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसनं बेस्टला दिलाय.
21 Dec 2022, 11:34 वाजता
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं राहुल गांधींना पत्र
Rahul Gandhi | Political News: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी राहुल गांधींना पत्र लिहिलंय. भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करण्याबाबतची सूचना या पत्रात करण्यात आलीय. एवढंच नाही तर जर कोरोना (Corona Virus)नियमांचं पालन करता येणार नसेल तर देशहितासाठी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) स्थगित करण्याचीही सूचना यात करण्यात आलीय. त्यामुळे आता यावरुन राजकारण तापण्याची चिन्हं आहेत
बातमी पाहा- कोरोनामुळे भारत जोडो यात्रा थांबणार?
21 Dec 2022, 10:41 वाजता
राज्यात आजपासून थंडीचा जोर वाढणार
State Cold | Marathi News LIVE Today : राज्यात आजपासून पुन्हा थंडीचा जोर वाढणार. उत्तर भारतात दाट धुके आणि थंड हवा वाढल्यामुळे जोरदार थंडी सुरू झाली आहे. या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात पडणाऱ्या थंडीपैकी सुरुवातीच्या 15 दिवसांतील थंडी मंदौस चक्री वादळाने हिरावून घेतली होती. मात्र आता मंदौस चक्री वादळाचा परिणाम आता पूर्णपणे ओसरला आहे.
बातमी पाहा- उकाड्यापासून दिलासा! गारठा वाढला, पाहा किती आहे तुमच्या शहराचं तापमान?
21 Dec 2022, 10:31 वाजता
Sanjay Raut Live | Maharashtra Political News : 'राज्य एवढं हतबल विकलांग कधीच नव्हतं', 'राज्य सरकार कोणाला तरी घाबरतंय', 'सरकारला कोणाची तरी भीती वाटतेय ?', 'भूमिका घेतली तर महाराष्ट्र पाठिशी उभं राहिल', खासदार संजय राऊत यांचा राज्य सरकार, केंद्र सरकारला टोला.