आताची मोठी बातमी! रिया चक्रवर्तीला A U नावानं 44 फोन, AU म्हणजे... राहुल शेवाळेंचा सनसनाटी गौप्यस्फोट

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात खासदार राहुल शेवाळे यांचा लोकसभेत सनसनाटी गौप्यस्फोट, महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी

Updated: Dec 21, 2022, 05:16 PM IST
आताची मोठी बातमी! रिया चक्रवर्तीला A U नावानं 44 फोन, AU म्हणजे... राहुल शेवाळेंचा सनसनाटी गौप्यस्फोट title=

Sushant Rajput Death Case : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी. शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेता सुशांत राजपूत याच्या मृत्यू  (Sushant Singh Rajput) प्रकरणात राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. सुशांत राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) A U नावाने 44 फोन आले होते, हा A U म्हणजे आदित्य-उद्धव (Aditya-Uddhav Thackeray) असल्याची बिहार पोलिसांनी (Bihar Police) माहिती दिल्याचा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला आहे. लोकसभेत (Loksabha) बोलताना शेवाळे यांनी ही सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. 

आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात याआधीही आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते, आता पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी शेवाळे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. राहुल शेवाळे यांनी पुरावे असतील तर सादर करावेत असं आव्हान मनिषा कायंदे यांनी केलं आहे. 

काय म्हटलंय राहुल शेवाळे यांनी
रिया चक्रवर्ती हिच्यावर एनसीबीने ड्रग्ससंबंधी आरोप केला होता. सुशांत सिंगच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर जे कॉल आले होते, त्या कॉलच्या संदर्भातला उल्लेख बिहार पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये निदर्शनास आले आहेत. ते कॉल A U या नावाने आले आहेत. रिया चक्रवर्तीची जी लिगल टीम आहे त्यांनी A U चा अर्थ अन्यन्या उद्धव असा सांगितला. पण मुंबई पोलिसांनी याबाबत कोणताही खुलासा केला नाही. बिहार पोलिसांनी जो तपास केला त्यात A U म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा त्याचा अर्थ होता अशी माहिती मला मिळाली आहे, असं राहुल शेवाळा यांनी म्हटलंय.

'खरी माहिती लोकांसमोर यावी'
याप्रकरणातील खरी माहिती लोकांसमोर यावी, यासाठी मी गृहमंत्र्यांना विनंती केली आहे की, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, सर्व प्रश्नांची उत्तरं मिळायाल हवीत, यादृष्टीने मी आज हा प्रश्न लोकसभेत उपस्थित केला असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी जी A U ची माहिती दिली ती वेगळी दिली. बिहार पोलीस A U बाबत जी माहिती देतायत ती एका राजकीय पक्षाशी संबंधीत देत आहेत त्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होतंय असं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय.

सुशांत सिंग हत्या प्रकरणात अजून क्लोजिंग रिपोर्ट आलेला नाही त्यामुळे लोकांपर्यंत मागणी यावी हाच यामागचा उद्देश असल्याचं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय. A U संदर्भात बिहार पोलीसांची माहिती खोटी असेल तर त्यासंदर्भात सीबीआयने खुलासा करावा अशी मागणीही राहुल शेवाळे यांनी केली आहे.