21 Dec 2022, 10:29 वाजता
Sanjay Raut Live | Maharashtra Political News : 'भूमिका घेत नसाल तर मुख्यमंत्रिपदावर अयोग्य', 'सरकारच्या तोंडात कोणी बोळा कोंबला ?', 'केंद्रीय गृहमंत्र्यांनी गुंगीचं इंजेक्शन दिलं का ?', खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारला सवाल.
21 Dec 2022, 10:13 वाजता
Sanjay Raut Live | Maharashtra Political News : 'सीमावादावर सरकारची बोटचेपी भूमिका', 'मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घ्या', 'सरकार बोम्मईंना उत्तर देणार की नाही ?', 'मुख्यमंत्री सीमावादावर का बोलत नाहीत ?' सीमावादावर खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल.
21 Dec 2022, 10:04 वाजता
ताजमहलावर जप्तीवर कारवाईची टांगती तलवार
Taj Mahal : जगातील आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल सध्या कर थकबाकीच्या वादात अडकलाय. 15 दिवसांत कर भरला नाही तर ताजमहालावर जप्तीची कारवाई करण्याची नोटीस बजावण्यात आलीय. पाणी आणि मालमत्ता कराची तब्बल 1 कोटी 40 लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी 2021-22 आणि 2022-23 या आर्थिक वर्षाची आहे. 15 दिवसांत थकीत कर जमा केला नाही तर ताज महाल जप्त केला जाईल असं नोटिशीत म्हटलंय. मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधिकाऱ्यांनी थकबाकीवर हात वर केलेत. स्मारकांना मालमत्ता कर लागू होत नाही तसंच ताजमहालचा कोणताही व्यावसायिक वापर नसल्यामुळे पाण्यावरील कर भरण्यास पुरातत्व सर्वेक्षण जबाबदार नाही असं त्यांनी म्हटलंय.
बातमी पाहा- ताजमहालावर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार
21 Dec 2022, 09:40 वाजता
Bharti Pawar Live | Political News : 'कोरोनासंदर्भात केंद्राची बैठक', 'देशावर काय परिणाम याची पाहणी करणार', 'आवश्यकता लागल्यास नवी नियमावली', कोरोना संदर्भात केंद्रीय मंत्री भारती पवार यांची माहिती.
बातमी पाहा- जगभरात कोरोनाचा कहर, केंद्रीय मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक
21 Dec 2022, 08:50 वाजता
समृद्धी हायवेवर स्पीड लिमिट ताशी 120 किमी
Samruddhi Mahamarg | Marathi News LIVE Today : समृद्धी हायवेवर (Samruddhi Mahamarg) आता गाडी चालवण्यासाठी स्पीड लिमिट निश्चित करण्यात आलंय. समृद्धी हायवे हा गाड्या दीडशे किलोमीटर प्रति तास वेगाने धावतील हे लक्षात ठेऊन बांधण्यात आला होता. पण हायवे सुरु झाल्यापासून अपघात आणि टायर फुटण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे ही वेगमर्यादा आता ताशी 120 किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विधानसभेत ही माहिती दिली. गाड्यांचा स्पीड लिमिट नियंत्रित राहण्यासाठी स्पीड गन लावण्यात येतील तसंच पेट्रोलिंग वाहनांची संख्या वाढवली जाईल अशी माहिती शंभूराज देसाईंनी दिली आहे.
बातमी पाहा- समृद्धी महामार्गावर आता गाडी चालवण्यासाठी स्पीड लिमिट निश्चित, अन्यथा कारवाई
21 Dec 2022, 08:05 वाजता
मुंबईकरांचं पाणी महागलं
Mumbai Water Expensive | Marathi News LIVE Today : मुंबईकरांचं पाणी (Water) महागलं आहे. कोरोनामुळे दोन वर्ष रखडलेली पाणी दरवाढ मुंबई महापालिका (BMC) प्रशासनानं अखेर अंमलात आणली आहे. मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तेव्हा आता हजार लीटरमागे मुंबईकरांना 35 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत. आधीच भाजीपाला, पेट्रोल दरवाढ अशा महागाईच्या झळा सोसणाऱ्या मुंबईकरांवर आता महागड्या पाण्याचीही भर पडणार आहे. जूनपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणाऱ्या या दरवाढीच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मंजुरी दिलीय. प्रशासक म्हणून सध्या आयुक्तांकडेच पालिकेचा कारभार आहे.. तेव्हा नगरसेवकांच्या अनुपस्थितीत पालिका प्रशासनाने या निर्णयाला मंजुरीही दिली आहे.
बातमी पाहा- मुंबईकरांचं पाणी महागलं! पाण्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे
21 Dec 2022, 07:52 वाजता
प्रजासत्ताक दिनापर्यंत सर्व बालकांचं गोवरचं लसीकरण होणार
Measles vaccination | Marathi News LIVE Today : राज्यात गोवरला (Measles) आळा घालण्यासाठी विशेष गोवर लसीकरण (vaccination) मोहिमेला सुरुवात करण्यात आलीय. त्यानुसार येत्या प्रजासत्ताक दिनापर्यंत सर्व बालकांचं लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणामध्ये 9 महिने ते 5 वर्ष वयोगटाच्या बालकांचा समावेश असेल. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या सर्व बालकांसाठी ही विशेष मोहीम आहे. मोहिमेअंतर्गत बालकांना MR1 आणि MR2 या लसीची मात्रा देण्यात येईल. राज्य कृती दलाने तयार केलेल्या आराखड्यानुसार ही मोहीम हाती घेण्यात आलीय. पहिला टप्पा 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत होता. आता दुसऱ्या टप्प्याला 15 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
21 Dec 2022, 07:43 वाजता
चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा उद्रेक
Corona Alert | World News : चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बातमी पाहा- कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका आहे? ही 3 लक्षणे दिसताच व्हा सावध
21 Dec 2022, 07:17 वाजता
अनिल देशमुखांच्या जामीनावर आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार
Anil Deshmukh | Maharashtra Political News : अनिल देशमुखांच्या जामीनावर आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे.. 22 डिसेंबरपर्यंत जामीनाला दिलेली स्थगिती वाढवण्यासाठी सीबीआयनं (CBI) हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सीबीआयनं या निकालाला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावर जानेवारीत सुनावणी होणं अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयात यंदा सुट्टीकालीन कोर्ट उपलब्ध नसल्यानं 3 जानेवारीपर्यंत स्थगिती वाढवण्याची सीबीआयकडून विनंती करण्यात आली आहे. त्यावर अनिल देशमुखांना (Anil Deshmukh)जामीन देणाऱ्या न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे आज सुनावणी होईल.