IND VS AUS 5th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावसकर (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज खेळवण्यात आली. सिडनी येथे खेळवण्यात आलेल्या या टेस्ट सीरिजच्या पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने दणदणीत मिळवला आणि 3-1 ने आघाडी घेऊन सीरिज जिंकली आहे. तर टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढवली असून तब्बल 10 वर्षांनी टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिज गमावली आहे. एवढंच नाही तर यामुळे टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीतून देखील बाहेर पडली आहे. परंतू या सगळ्यातही भारतासाठी एकमेव गुडन्यूज समोर आली आहे.
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाचवा टेस्ट सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व जसप्रीत बुमराहने केलं होतं. बुमराहने टॉस जिंकून सुरुवातीला फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 185 धावा केल्या. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या अपहील्या इनिंगमध्ये 181 धावांवर ऑल आउट केले. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मोठं आव्हान देण्याकरता फलंदाजीसाठी उतरली खरी मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी अटॅक समोर 157 धावांवर ऑल आउट झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 158 धावांचं आव्हान मिळालं होतं, हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून तिसऱ्याच दिवशी पूर्ण केलं. यासह ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिज जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी एडिलेड येथे झालेला दुसरा आणि मेलबर्नमध्ये झालेला चौथा टेस्ट सामना देखील जिंकला होता. तर भारताला केवळ पर्थ येथे झालेला पहिला टेस्ट जिंकणं शक्य झालं होतं.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पर्थ आणि सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणारा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला त्याच्या परफॉर्मन्ससाठी प्लेअर ऑफ द सीरिजच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. बुमराहने 5 सामन्यांच्या या सीरिजमध्ये तब्बल 32 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने या सीरिजमध्ये त्याच्या गोलंदाजीचा जबरदस्त परफॉर्मन्स दिला. यासह त्याने भारताचे कर्णधारपद देखील सांभाळले.
हेही वाचा : तब्बल 10 वर्षांनी टीम इंडियाने गमावली बॉर्डर गावसकर ट्रॉफी, WTC फायनलमधून बाहेर
यंदा 5 सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने जिंकलेली एकमेव पर्थ टेस्ट जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळली होती. तर निर्णायक सिडनी टेस्टमध्ये देखील बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाने इतर सामन्यांच्या तुलनेत चांगला खेळ केला. मात्र बुमराहला टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुखापत झाल्याने तो तिसऱ्या खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 158 धावांचे आव्हान दिले असताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 4 विकेट्स घेतल्या होत्या, मात्र बुमराह जर खेळला असता तर कदाचित टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या जास्त विकेट्स घेणे शक्य झालं असतं. बुमराहने बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान दाखवलेल्या नेतृत्व शैलीमुळे रोहित शर्मानंतर बुमराहकडे टीम इंडियाचा भावी कर्णधार म्हणून पाहिलं जातं आहे.
JASPRIT BUMRAH WON THE PLAYER OF THE SERIES AWARD
- ONE OF THE GREATEST PERFORMANCE EVER. pic.twitter.com/Ve1TSbnutA
— Johns. (CricCrazyJohns) January 5, 2025
matches.
Wickets
Incredible spells TeamIndia Captain Jasprit Bumrah becomes the Player of the series AUSvIND | Jaspritbumrah93 pic.twitter.com/vNzPsmf4pv— BCCI (BCCI) January 5, 2025
टीम इंडिया प्लेईंग 11 : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज