Maharashtra Political News | Live Marathi News : उद्धव ठाकरेंची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली.

Maharashtra News | Marathi News LIVE Today: दिवसभरातील ताज्या बातम्या, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मुंबई पुणे नागपूरसह राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक, क्रिकेट, फिफा विश्वचषक तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Political News | Live Marathi News : उद्धव ठाकरेंची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली.

16 Dec 2022, 21:42 वाजता

ठाकरे गटाला दिल्ली हायकोर्टाचा दणका

Delhi Highcourt on Thackeray group | Maharashtra Political News : दिल्ली हायकोर्टानं ठाकरे गटाला मोठा दणका दिलाय. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) याचिका दिल्ली हायकोर्टानं (Delhi Highcourt) फेटाळलीय. शिवसेनेचं नाव, चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिलाय.

बातमी पाहा - https://bit.ly/3YvhE0T

 

 

16 Dec 2022, 20:56 वाजता

कोकण विकासासाठी KRDA

KRDA for Konkan Development | Maharashtra Political News : MMRDAच्या धर्तीवर लवकरच कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाची निर्मिती केली जाणारंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) कोकणासाठी मोठी घोषणा केलीय. या प्राधिकरणामुळे कोकणच्या विकासाला गती मिळेल अशी ग्वाही शिंदेंनी दिलीय. प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्ते, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधांवर भर देण्यात येईल असंही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलंय. 

बातमी पाहा - https://bit.ly/3FUYKJM

16 Dec 2022, 18:39 वाजता

बाफना खूनप्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा

Nashik Murder Case | Marathi News LIVE  : नाशिकमधल्या बहुचर्चित बाफना खून प्रकरणी (Bafna Murder Case)दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय. नाशिकमध्ये साडेनऊ वर्षांपूर्वी एक कोटीच्या खंडणीसाठी विपीन गुलाबचंद बाफना या 22 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. या अपहरण आणि हत्येप्रकरणी चेतन यशवंत पगारे, अमन प्रकट सिंग जट यांना दोषी ठरवत कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावलीय. तर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय.

बातमी पाहा - https://bit.ly/3FtrZ4W

16 Dec 2022, 17:24 वाजता

मविआच्या मोर्चासाठी अडीच हजार पोलीस बंदोबस्त 

Mahavikas Aghadi Morcha | Maharashtra Political News : महाविकास आघाडीच्या मोर्चाला लिखित परवानगी. मविआच्या मोर्चासाठी अडीच हजार पोलीस बंदोबस्त. मोर्चावर 2 अतिरिक्त आयुक्त, 5 DCP ठेवणार नजर, मविआच्या मोर्चासाठी सीआरपीएफची तुकडी तैनात. मविआच्या मोर्चावर ड्रोन कॅमेऱ्यांची राहणार नजर.

बातमी पाहा - https://bit.ly/3HBCZQu

16 Dec 2022, 17:02 वाजता

मविआच्या मोर्चाचं स्वरूप आणि रणनीती ठरली

Mahavikas Aghadi Morcha | Maharashtra Political News : महाविकास आघाडीच्या मोर्चाला लिखित परवानगी. मविआच्या मोर्चाचं (Mahavikas Aghadi Morcha) स्वरूप आणि रणनीती ठरली. उद्या भायखळा एटीएस कार्यालयापासून मोर्चा सुरू होणार. एमएमआरडीए परिसरातून शिवसेना-एनसीपी-काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सकाळी 10 वा. यायला सुरूवात होणार. प्रत्येकी तीन प्रमुख पक्ष साधरण 25 हजार प्रत्येकी आणि मित्र पक्ष असे करून साधरण 1 लाख लोक जमविण्याचा प्रयत्न. उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांसह प्रमुख नेते दुपारी 12 वाजेच्या सुमारास मोर्चास्थळी पोहचणार. 

जे. जे. फ्लायओव्हरवरून चालत सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलजवळ  टाईम्स इमारत येथे पोहचणार. मोर्चा समारोप येथे सभा घेत प्रमुखनेते भाषण करणार. समाजवादी पक्षाचे मुस्लीम कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोर्चाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बातमी पाहा - https://bit.ly/3PEXgXh 

16 Dec 2022, 15:15 वाजता

दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीचा वाद

Besharam Rang Song Controversy : पठाण फिल्मच्या (Pathaan Film) निर्माते, दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांनी केलीय. महाराष्ट्रच्या भूमी वर हिंदुत्वाचा अपमान करणारा चित्रपट किंवा सीरियल चालू देणार नाही, असा इशारा राम कदम यांनी दिलाय. 

16 Dec 2022, 14:19 वाजता

भाजपचं उद्या माफी मागो आंदोलन

Aashish Shelar on mahavikasaghadi | Maharashtra Politics : एकीकडे महाविकास आघाडीने उद्या महामोर्चाचं रणशिंग फुंकलं असताना भाजपने माफी मांगो आंदोलनातून त्याला प्रत्युत्तर देण्याची रणनीती आखलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महाविकास आघाडी सातत्याने महापुरूषांचा अपमान करत आहे असा आरोप करत भाजप उद्या मुंबईभर माफी मांगो आंदोलन करणार आहे. उद्या मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघात भाजप आक्रमकरित्या माफी मांगो निदर्शनं करणार आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांनी माफी मागावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. 

बातमी पाहा - मविआच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपची रणनिती, उद्या माफी मांगो आंदोलन

16 Dec 2022, 13:16 वाजता

आंबेडकर जन्मस्थळावरुन राजकीय घमासान

Aashish Shelar on Sanjay Raut | Maharashtra Political News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जन्मस्थळाचा वाद संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) पक्ष जाणीवपूर्वक निर्माण करत आहेत असा आरोप आशिष शेलार यांनी केलाय. राऊतांना वाद निर्माण करण्याची अफगाणी सुपारी मिळाली मिळालीय असा आरोप शेलारांनी (Aashish Shelar) केलाय. राऊतांनी बाबासाहेबांचं चरित्र वाचावं यासाठी भाई गिरकर यांनी त्यांना दोन पुस्तकं पाठवल्याचं शेलार म्हणाले.  

बातमी पाहा - "अज्ञान पाजळायची संधी संजय राऊत यांनी सोडलेली नाही"

16 Dec 2022, 11:27 वाजता

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

Pune Fake Call Center | Marathi News LIVE : पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी मुंबईत धडक कारवाई करत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केलाय...मुलुंडमधील बनावट कॉल सेंटरमध्ये धडक देत ही कारवाई केली...बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक होत होती...बजाज फिन्सर कंपनीच्या नावाने ही लूट सुरू होती...बिनव्याजी कर्ज देण्याच्या नावाने ग्राहकांना लुटलं जात होतं...याची तक्रार पोलिसांकडे येताच पुणे पोलिसांनी या बनावट कॉल सेंटरचा शोध घेतला...यावेळी कॉलसेंटरमध्ये 43 लोकांमार्फत फोन केले जात असल्याचं उघडकीस आलं...कोट्यवधी रुपयांची फसवणूक या कॉल सेंटरच्या माध्यमातून करण्यात आलीय...आता पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत, 40 मोबाईल, 7 हार्ड डिस्क जप्त केल्यायत...

बातमी पाहा - पुणे पोलिसांची मुंबईत मोठी कारवाई; बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त

16 Dec 2022, 10:26 वाजता

लावणी कलाकार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ

Beed Gautami Patil Dance | Marathi News LIVE : लावणी कलाकार गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात गोंधळ झालाय...बीडमध्ये एका हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा लावणी डान्स सुरू होता...यावेळी गर्दी झाल्याने काहींनी स्टेजवर प्रवेश केला...यावेळी कार्यक्रमात गोंधळ उडाला...परळी रोडवरील कार्यक्रमात गोंधळ झाल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली...यावेळी गौतमी पाटीलने डान्स थांबवला...

बातमी पाहा - गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ