Maharashtra Political News | Live Marathi News : उद्धव ठाकरेंची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली.

Maharashtra News | Marathi News LIVE Today: दिवसभरातील ताज्या बातम्या, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मुंबई पुणे नागपूरसह राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक, क्रिकेट, फिफा विश्वचषक तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Political News | Live Marathi News : उद्धव ठाकरेंची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली.

16 Dec 2022, 10:17 वाजता

ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेला खतपाणी

Sangali Black Magic | Marathi News LIVE : सांगली जिल्ह्यात खानापूर आणि वाळवा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत (Grampanchayat Election) अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातंय.निवडून येण्यासाठी उमेदवार जादूटोणा-भानामतीसारख्या प्रकाराचा आधार घेतायत. वाळवा तालुक्यात कनेगावाच्या चौकात मध्यरात्री अज्ञातांनी टोपलीत केळी, कापड, बाहुल्या, लिंबू, हळद-कुंकू टाकलेलं साहित्य ठेवलेलं. तर खानापूर जाधवनगरमध्ये प्रचाराच्या बॅनर समोर नारळ, हळदी कुंकू, लिंबू ठेवलंलं आढळलं.  

16 Dec 2022, 09:31 वाजता

वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक

Vande Bharat Express : नागपूर-बिलासपूर वंदे भारत ट्रेनवर (Nagpur-Bilaspur Vande Bharat) दगडफेक झाल्याची घटना घडलीय. छत्तीसगडच्या (Chhattisgarh) भिलाईजवळ समाजकंटकांकडून दगडफेक (Stone Pelting)  करण्यात आली...दगडफेकीमुळे वंदे भारत ट्रेनच्या खिडकीची काच फुटली...सुदैवाने दगडफेकीत कुणीही जखमी झालेलं नाही...बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली...नागपूर ते बिलासपूर वंदे भारत ट्रेनला 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला....त्यानंतर ही ट्रेन सुरू झाली...छत्तीसगडमधील दुर्गजवळ ही घटना घडली असून, या संपूर्ण प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतलीय...

बातमी पाहा - वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक

16 Dec 2022, 09:08 वाजता

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काळी जादू?

Kolhapur Black Magic | Marathi News LIVE : कोल्हापुरात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये (Grampanchayat Election) करणी भानामती यासारखे प्रकार दिसून येत आहेत. काही ठिकाणी साधूंना बोलावून वेगवेगळ्या पूजाअर्चा केला जात असल्याचं उघडकीस आलंय...कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक अवघ्या एक दिवसावर येवून ठेपलीय...यातूनच बामणी गावांमध्ये एका उमेदवाराकडे चार परप्रांतीय साधू आल्याने चर्चांणा उधाण आलंय...हा प्रकार समजताच गावातील तरुणांनी या साधूंचा पाठलाग करत त्यांना गावातून पिटाळून लावलं...सुरुवातीला गावातील उमेदवाराचा पत्ता विचारणारे साधू नंतर मात्र आपण रामेश्वरच्या यात्रेसाठी जात असल्याचे कारण सांगितले. पण तरुणांनी रामेश्वर यात्रा गावात नसताना गावात काय काम असा जाब विचारात या साधूंवर प्रश्नाचा भडीमार केला...हे साधू कसे बसे ग्रामस्थांच्या तावडीतून सुटले...पण हे साधू नेमकं कोणत्या उमेदवाराकडे आले होते, तो उमेदवार साधूंना बोलावून काय करणार होता हे मात्र गुलदस्त्यात आहे.

बातमी पाहा - ग्रामपंचायत निवडणुकीत काळी जादू? कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार समोर

16 Dec 2022, 08:45 वाजता

सोन्याच्या भावात नव्या वर्षात मोठी तेजी

Gold Price Update : सोन्याच्या दरात सध्या मोठी तेजी पाहायला मिळतेय.. नव्या वर्षात सोनं 64 हजारांवर जाण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मागच्या दीड ते दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झालीय. डिसेंबर अखेरपर्यंत सोन्याचे दर 56 हजारपेक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे सोन्याला मोठी मागणी आहे. सोनं खरेदीसाठी त्यामुळे सराफा दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून येतेय. एकीकडे शेअर बाजारात पडझड झालेली पाहायला दिसतेय, तर दुसरीकडे लोकांचा कल सोने खरेदीकडे दिसतोय.

बातमी पाहा - सोने खरेदी करण्यापूर्वी ही बातमी वाचा, पाहा नवीन दर

16 Dec 2022, 08:23 वाजता

कोरोनानं पुन्हा जगाचं टेन्शन वाढवलं

China Corona Update : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सर्व सुरळीत सुरू होतं...पण, आता पुन्हा एकदा कोरोनानं जगाचं टेन्शन वाढवलंय...चीनमध्ये (China) कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron Varient) झपाट्याने पसरत असल्याने कोरोनाचा उद्रेक झालाय...ओमायक्रॉनचा BF.7 हा व्हेरियंट वेगानं पसरतोय...वेगानं रुग्णवाढ होत असताना गेल्या आठवड्यात निर्बंधांमधून सूट देण्यात आलीय...यामुळे येत्या काही महिन्यात चीनमध्ये 20 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय...हाँगकाँगमधील शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार तब्बल 20 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता वर्तवलीय...

बातमी पाहा - चीनमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान, जगाची चिंता वाढली

16 Dec 2022, 08:08 वाजता

जेईई मेन परीक्षा जानेवारीत होणार

JEE Main Exam Date | Marathi News LIVE : जेईई मेन परीक्षेसंदर्भात मोठी बातमी... जानेवारीमध्ये जेईईची मेन परीक्षा होणार आहे. पहिल्या सत्राची परीक्षा जानेवारी 2023 मध्ये होणार असून अर्ज भरण्याची सुरुवात कालपासून झाली आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 12 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलीय. jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थी अर्ज भरू शकणार आहेत. तर जानेवारीतच अ‍ॅडमिट कार्डही विद्यार्थ्यांना मिळेल. जेईईसाठी मराठीसह 13 भाषांमध्ये परीक्षा होईल.  JEE-Mains द्वारे NIT, Triple IT, GFTI मध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जेईई-मेन रँकच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  

बातमी पाहा - जेईई मेन परीक्षेसंदर्भातील मोठी बातमी; सर्व महत्त्वाच्या तारखा एका क्लिकवर

16 Dec 2022, 07:43 वाजता

मुलींना वश करण्यासाठी जादूटोणा?

Kolahpur Black Magic | Marathi News LIVE : शाहूंच्या पुरोगामी कोल्हापुरात अंधश्रद्धेचा (Superstition) अघोरी प्रकार समोर आलाय...परडीत मुलींचा फोटो ठेऊन त्यावर हळद कुंकू, लिंबूला टोचलेल्या टाचण्या, हिरवं कापड असा उतारा ठेवल्याचा धक्कादायक घडलाय...बालिंगा-पाडळी रस्त्यावर हा जादूटोण्याचा (Black Magic) प्रकार उजेडात आलाय...हा अघोरी प्रकार कुणी केला...? याचा तपास आता पोलीस करतायत...पण, वशीकरणासाठी करण्यात आलेल्या या काळ्या जादूच्या घटनेमुळे आता पाडळी खुर्द या गावातील मुलींना घराबाहेर पडता येत नाहीये...त्यांची शाळा बंद होतेय की काय अशी परिस्थिती आहे.

बातमी पाहा - फोटोवर हळद- कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू आणि...; महाराष्ट्रात मुलींवर वशीकरण

16 Dec 2022, 07:16 वाजता

मविआच्या महामोर्चाला परवानगी मिळणार?

Mahavikas Aghadi Morcha | Maharashtra Political News : महाविकास आघाडीच्या मुंबईतील महामोर्चासाठी अजून परवानगी मिळालेली नाही. आज पोलीस महामोर्चाला परवानगी देतील का याकडे लक्ष लागलंय. उद्याच्या महामोर्चासाठी महाविकास आघाडी ठाम आहे. लोकशाही मार्गाने मोर्चा काढणारच असा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी (MVA Leaders) केलाय. "महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल" या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. यासाठी ठाकरे गट (Thackeray Group), राष्ट्रवादी (Nationalist Congress Party) आणि काँग्रेस (Congress) या तीनही पक्षांनी तीन लाखांहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचं लक्ष ठेवलं आहे. विराट मोर्चा ऐतिहासिक करण्याचा प्रयत्न आहे. मात्र एवढं सगळं प्लॅनिंग केलं असलं तरी अजून परवानगीचं काय असा प्रश्न उपस्थित आहे. महाविकास आघाडीच्या या मोर्चाला समाजवादी पक्षापासून सीपीआय, मराठा क्रांती ठोक मोर्चा या संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यपाल हटाओपासून शिवाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याबाबतच्या मागण्या मोर्चात पाहायला मिळणार आहेत.