8 Jan 2023, 23:44 वाजता
मुंबई मनपावर भाजपचा झेंडा ही अटलजींना श्रद्धांजली- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : मुंबई महापालिकेवर भगवा फडकावणं हीच अटलजींना खरी श्रद्धांजली असेल, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलंय. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल महाकुंभ कार्यक्रमाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांचा अटल सन्मानानं गौरव करण्यात आला. त्यावेळी फडणवीसांनी मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता यावी, हे अटलजींचं स्वप्न होतं याची आठवण करुन दिली.
8 Jan 2023, 23:01 वाजता
संधी मिळाली नाही तर स्वाभिमानानं एक्झिट- पंकजा मुंडे
Pankaja Munde : 'संधी मिळाली नाही तर स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी वक्तव्य केलंय. मला संधी का देत नाही, याचं उत्तर संधी न देणाऱ्यांना विचारा, अशी सूचक नाराजी देखील त्यांनी बोलून दाखवली. नाशिकमधील स्टुडंट समिट कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.
बातमी पाहा- स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा; पंकजा मुडे राजकारणातून बाहेर पडणार?
8 Jan 2023, 22:33 वाजता
12 जानेवारीला राज ठाकरे परळी कोर्टात हजर राहणार
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 12 जानेवारीला बीडमधील परळी न्यायालयात हजेरी लावणार आहेत. 2008 मध्ये परळीमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. याप्रकरणी राज ठाकरेंसह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी परळी न्यायालयाने राज ठाकरे (Raj Thackeray) यांना दोन वेळा अटक वॉरंट जारी केले होते.
8 Jan 2023, 21:12 वाजता
महाराष्ट्राचा कुस्तीपटू अभिजीत कटके ठरला 'हिंद केसरी'
Hind Kesari : महाराष्ट्राचा कुस्तीपटू अभिजीत कटके अखेर 'हिंद केसरी' ठरलाया. हैद्राबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं हरियाणाचा पैलवान सोमवीर याला धोबीपछाड दिला.. हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कटके अजिंक्य ठरलाय.. त्यामुळं पुन्हा एकदा हिंद केसरी होण्याचा बहुमान महाराष्ट्राला मिळालाय.
बातमी पाहा- पुण्याचा अभिजीत कटके 'हिंद केसरी'; पटकावली मानाची गदा!
8 Jan 2023, 20:53 वाजता
सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात 10 जानेवारीला सुनावणी होणार
Maharashtra Political Crisis : सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात 10 जानेवारीला सुनावणी होणार. 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना करण्याची ठाकरे गट मागणी करणार. नबम राबिया केस मध्ये 5 जजेस बेंचनं सुनावणी घेतली. त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्षावर 7 बेंच जजेसनं सुनावणी करावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टात करणार.10 जानेवारीला केसचे वेळापत्रक ठरवण्यासाठी सुनावणी.
8 Jan 2023, 19:41 वाजता
रुपाली चाकणकरांचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर
Rupali Chakankar on Chitra Wagh : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)यांना प्रत्युत्तर दिलंय. अध्यक्षपदावर असलेली एकटी व्यक्ती नोटीस पाठवू शकत नाही असा टोला चित्रा वाघ यांनी लगावलेला होता, त्यावर नोटीस नीट वाचली असती तर असे प्रश्न पडले नसते असं प्रत्युत्तर (Rupali Chakankar) चाकणकरांनी दिलंय.
बातमी पाहा- उर्फी प्रकरण तापलं,रुपाली चाकणकर यांचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर
8 Jan 2023, 18:58 वाजता
येवल्यात नायलॉन मांज्याने तरुणाचा गळा चिरला
Yeola Nylon Manja : नाशिकच्या येवला शहरात नायलॉन मांज्याने तरुणाचा गळा चिरला गेला. कोटमगाव रोड बायपास मार्गाने दुचाकीवरून जाताना रितेश मुथा याच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. त्याच्या गळ्याला 12 टाके पडलेत. मकर संक्रांतीचा सण काही दिवसांवर आलेला असताना जीवघेणा नायलॉन मांज्याचा सर्रास वापर चिंता वाढवणारा आहे.
8 Jan 2023, 17:33 वाजता
पुरंदरमध्ये काका- पुतण्याचा जमीन वादातून खूनाचा प्रयत्न
Purandar Crime : जमिनीच्या वादातून काकाने पुतण्याला रॉकेल अंगावर टाकून पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही घटना आहे पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथील काका भास्कर भुजबळ यांनी पुतण्या स्वप्नील भुजबळ याच्या अंगावर रॉकेल टाकून हातामध्ये पेटता टेंभा घेऊन मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवळ जमिनीचा वाद आणि पैसे यातून पेटवूण्याचा प्रकार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
8 Jan 2023, 16:14 वाजता
रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष
Rohit Pawar : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार (Rohit Pawar) यांची बिनविरोध निवड झालीय. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant)यांची उपाध्यक्षपदी निवड झालीय. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत ही निवड करण्यात आलीय. आजोबा शरद पवारांनंतर आता रोहित पवारांचीही आता क्रिकेटच्या मैदानात दमदार एन्ट्री झालीय.
बातमी पाहा- आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात
8 Jan 2023, 14:18 वाजता
देशात रामराज्य निर्माण करायचंय - गडकरी
Nagpur Nitin Gadkari | Marathi News LIVE Today : देशात रामराज्य (Ramrajya) निर्माण करायचंय असं नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपुरात म्हटलंय. मानवी अस्मिता जागृत करण्यासाठी राममंदिराचं (Rammandir) निर्माण कार्य सुरू असल्याचं गडकरी म्हणाले. रामराज्य निर्माण करण्यासाठीच आपलं कार्य सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. नागपूर ते रामटेक या हिंदुत्ववादी संघटनांच्या बाईकरॅलीला हिरवा झेंडा गडकरींच्या हस्ते दाखवण्यात आला...