10 Jan 2023, 23:02 वाजता
टीम इंडियाने चारली श्रीलंकेला धूळ
IND Vs SL 1st ODI : भारतानं पहिल्याच वनडेमध्ये श्रीलंकवर दणदणीत विजय मिळवलाय. टीम इंडियाने श्रीलंकेला 67 धावांनी नमवत मालिकेत 1-0नं आघाडी घेतलीय. प्रथम फलंदाजी करता भारतानं श्रीलंकेसमोर 374 धावांचं भलंमोठ्ठं आव्हान ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेची सुरुवात अतिशय संथ झाली. श्रीलंकन कर्णधार दासून शनाकानं शतकी खेळी करत भारताला विजयासाठी चांगलीच प्रतिक्षा करायला लावली. दरम्यान, भारताकडून उमरान मलिकनं 3 तर सिराजनं 2 विकेटस घेतल्या.
बातमी पाहा - रोहितसेनेकडून पहिल्याच सामन्यात लंकादहन; पण श्रीलंकेच्या शेपटाने झुंजवलं
10 Jan 2023, 19:01 वाजता
धनुष्यबाणासाठी 17 जानेवारीला लढाई
Election Comission Hearing : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Comission) धनुष्यबाण चिन्हासाठी झालेल्या पहिल्याच सुनावणीत ठाकरे (Thackeray Group) आणि शिंदे गटानं (Shinde Group) जोरदार युक्तिवाद केला.सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत सुनावणी घेऊ नका अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. तर सुप्रीम कोर्टानं आज कुणालाही अपात्र ठरवलेले नाही, त्यामुळे चिन्हाचा निर्णय़ घेण्यास काहीही हरकत नसल्याचा प्रतिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेत बेकायदा बदल केल्याचा दावाही केला. आता पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार आहे.
बातमी पाहा - उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत; शिंदे गटाचा खळबळजनक दावा
10 Jan 2023, 18:28 वाजता
नागपूर एअरपोर्टवर कस्टम विभागाची कारवाई, दीड किलो सोनं जप्त
Nagpur Gold Seized : नागपूर विमानतळावर 68 लाख रुपयांचं दीड किलो सोनं जप्त (Gold Seized) करण्यात आलंय. कस्टम विभागानं (Custom Department) ही कारवाई केलीय. हा स्मगलर मुंबई-नागपूर असा प्रवास करुन आला होता. धक्कादायक म्हणजे त्यानं अंतर्वस्त्रात सोनं लपवून आणलं होतं. Go First Flight विमानातून हा व्यक्ती प्रवास करत होता.. डोमेस्टिक फ्लाईटमधून (Domestic Flight) सोने तस्करीची ही पहिलीच घटना आहे.
बातमी पाहा - प्रवाशाच्या अंतर्वस्त्रातून जप्त केलं ६८ लाखांचं सोनं; मुंबई-नागपूर विमानातून सोन्याची तस्करी
10 Jan 2023, 17:40 वाजता
थोडी-थोडी पिणाऱ्यांनाही कॅन्सरचा धोका
WHO On Alcohol : तुम्ही दारूचा एक थेंब जरी घ्याल तरी तुम्हाला कँसर झालाच म्हणून समझा....हे आम्ही नव्हे तर जगातली आरोग्याबाबतची सर्वात मोठी संस्था WHOनं सांगितलंय. WHOच्या एका संशोधनात धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय. कमी प्रमाणात दारू प्यायलात तर आरोग्याला हानिकारक नाही असं जर तुम्ही समजत असाल तर तुम्ही साफ चूक आहात. कारण दारूचा एक थेंब जरी प्यायलात तरी तुम्हाला कँसरचा धोका आहे. दारू सेवनावर अनेक संशोधनं करण्यात आली असून त्याबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे करण्यात आले आहेत. मात्र आता थेट WHO नंच याबाबत धक्कादायक दावा केलाय. दारूचा पहिला थेंब घेतल्यानंतर लगेचच शरीराला कॅन्सरचा धोका असल्याचं WHO च्या संशोधनात उघड झालंय. त्यामुळे दारू पिण्याचं प्रमाण कितीही असलं तरी कँसरपासून सुटका नाही...
बातमी पाहा - 'थोडी दारु घेतली तर काय नाय होत' असं म्हणणाऱ्यांना WHO चा मोठा इशारा
10 Jan 2023, 17:34 वाजता
विराट कोहलीची तडाखेबंद सेंच्युरी
Virat Kohli Century : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या वनडेमध्ये (India vs Sri-Lanka 1st ODI) विराट कोहलीनं (Virat Kohli) शानदार शतक झळकावलंय. कारकिर्दीमधील वनडेतील त्यानं हे 45 वं शतक ठोकलंय. 11 फोर आणि 1 सिक्स लगावत त्यानं हे शतक साकारलंय. या शतकानं त्यानं या वर्षाची शानदार सुरुवात केलीय. तर डिसेंबरमध्येच बांग्लादेशविरोधात त्यानं आपला शतकांचा दुष्काळ दूर करत 3 वर्षांनंतर शतक झळकावलं होतं. दरम्यान कारकिर्दीतलं 73 वं शतक झळकावलंय. तर त्यानं सचिन तेंडुलकरला ही शतकांमध्ये मागे टाकलंय.
बातमी पाहा - अनस्टॉपेबल 'कोहली'... श्रीलंकेविरुद्ध वादळी शतक; सचिनच्या बड्या रेकॉर्डची बरोबरी!
10 Jan 2023, 17:21 वाजता
पहिल्या वन-डेमध्ये टीम इंडियाचा 373 रन्सचा डोंगर
India vs Sri-Lanka 1st ODI : भारतानं (Team India) पहिल्याच वनडेमध्ये श्रीलंकेसमोर (Sri-Lanka) 374 धावांचं भलंमोठ्ठं आव्हान उभं केलंय. भारतानं 50ओव्हरमध्ये ७ विकेट गमावत 374 धावा केल्यात. यात विराटच्या (Virat Kohli) शानदार 113 रनस्चा समावेश आहे. रोहित (Rohit Sharma) आणि शुभमन गिलनं (Shubhman Gill) संयमी पण तडाखेबाज सुरुवात करून भारताला चांगल्या स्थितीत आणलं आणि त्यावर विराटनं कळस चढवत श्रीलंकेसमोर मोठं आव्हान ठेवलंय.
बातमी पाहा - रोहित-विराटची तुफान फटकेबाजी, टीम इंडियाचं श्रीलंकेसमोर डोंगराएवढं आव्हान
10 Jan 2023, 16:48 वाजता
मुंबईतही बोगस शाळांचा घोटाळा उघड
Mumbai Bogus School : बोगस शाळांबाबत आणखी एक धक्कादायक बातमी... पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही (Mumbai) बोगस शाळांचा घोटाळा समोर आलाय... मुंबईतील 2 शाळांची एनओसी बनावट असल्याचा संशय आहे. या दोन्ही बोगस शाळा (Bogus School) शिक्षण खात्याच्या रडारवर आहेत... केवळ मुंबईच नव्हे, तर नागपुरातही बोगस शाळा असल्याचा संशय आहे...
बातमी पाहा - मुंबईतही बोगस शाळांचा घोटाळा उघड
10 Jan 2023, 16:34 वाजता
ठाकरे आणि राष्ट्रवादीची निवडणूक रणनीती
Thackeray Group & NCP Leader Meet : ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. अजित पवार आणि सुभाष देसाईंसह इतर महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढवण्यात बैठकीत चर्चा होणार आहे तसंच प्रकाश आंबेडकरांना महाविकासआघाडीत घेण्याबाबत बैठकीत चर्चा होऊ शकते
बातमी पाहा - ठाकरे आणि राष्ट्रवादीची निवडणूक रणनीती
10 Jan 2023, 15:30 वाजता
मेट्रोचा खांब कोसळला, आई आणि मुलाचा मृत्यू
Bengluru Metro Piller Collapse : कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये (Bengluru) मेट्रोचा खांब कोसळून आईसह मुलाचा मृत्यू झालाय.. आज सकाळी अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.. मेट्रोचा खांब कोसळला (Metro Piller Collpase) त्याच वेळी चौघांचं एक कुटुंब मोटारसायकलवरुन जात होतं.. हे चौघांच्या अंगावर हा मेट्रोचा खांब कोसळला.. या दुर्घटनेत तेजस्विनी आणि अडीच वर्षाच्या विहानचा जागीच मृत्यू झालाय तर महिलेचा पती लोहित आणि मुलगी गंभीर जखमी झालीये.. या दोघांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ओव्हरलोडमुळे हा खांब कोसळल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिलीये.
10 Jan 2023, 14:48 वाजता
ICICI बँकेच्या माजी MDचंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची कारागृहातून सुटका
Chanda Kochhar : ICICI बँकेच्या माजी MDचंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची कारागृहातून सुटका झालीये. या दोघांना प्रत्येकी 1 लाखांच्या जात मुचलक्यावर तसंच काही अटी शर्थी घालून जामीन देण्यात आलाय. आयसीआयसीआय बँकेत पदावर असताना व्हीडिओकॉन कंपनीला कर्ज वाटप प्रकरणी पैश्याची अफरातफर केल्याचा कोचर यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयनं त्यांना अटक केली होती. दरम्यान हायकोर्टानं काल त्यांचा जामीन मंजूर केला. मात्र काल कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं त्यांना कालची रात्र तुरुंगातच काढावी लागली.. आज सकाळी कार्यालयीन कारवाई पूर्ण झाल्यानंतर दोघांनाही कारागृहातून सोडण्यात आलं.
बातमी पाहा- चंदा कोचर आणि दीपक कोचर तुरुंगाबाहेर