Alcohol Drinking Habits : 'थोडी दारु घेतली तर काय नाय होत' असं म्हणणाऱ्यांना WHO चा मोठा इशारा

 'थोडी दारु घेतली तर काय नाय होत' असं म्हणणाऱ्यांना WHO ने मोठा इशारा दिला आहे. एक थेब दारुही शरीरासाठी घातक ठरु शकते. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने दारुच्या सेवनाबाबत नविन संशोधन केले. यात हा दावा करण्यात आला आहे.

Updated: Jan 9, 2023, 07:58 PM IST
Alcohol Drinking Habits : 'थोडी दारु घेतली तर काय नाय होत' असं म्हणणाऱ्यांना WHO चा मोठा इशारा title=

Alcohol Drinking Habits :  अनेकांना अती प्रमाणात मद्यपान करण्याचे व्यसन जडलेले असते. तर, थोडी दारु घेतली तर काय नाय होत असं म्हणत अनेकजण नियमीत मद्यपान करत असतात. 'थोडी दारु घेतली तर काय नाय होत' असं म्हणणाऱ्यांना WHO ने मोठा इशारा दिला आहे. एक थेब दारुही शरीरासाठी घातक ठरु शकते. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने दारुच्या सेवनाबाबत नविन संशोधन केले. यात हा दावा करण्यात आला आहे.  दारु अती प्रमाणात घ्या अथवा कमी प्रमाणात घ्या ती आरोग्यासाठी धोकादायकच असल्याचा इशारा WHO ने दिला आहे. WHO च्या नवीन अहवालानुसार, अल्कोहोलचा एक थेंब देखील कर्करोगाचा धोका निर्माण करु शकतो. 

द लॅन्सेट पब्लिक हेल्थमध्ये अल्कोहोलच्या सेवनासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. दारु पिण्याची सवय ही आरोग्यासाठी हानीकारकच आहे. यामुळे कमी अथवा जादा असे प्रमाण ठरवणेच चुकीचे असल्याचे या अहवालात म्हंटले आहे. कमी प्रमाणात अल्कोहोल पिण्याची पद्धत देखील धोकादायक असल्याची चेतावनी WHO ने दिली आहे.

कमी प्रमाणात दारु घेतली तर काही नाही होत असं म्हणत अनेक जण नियमीत दारु पित असतात. मात्र, ज्या प्रमाणे अती प्रमाणात दारुचे व्यसन केल्याने शरीराला हानी पोहचते. त्याचप्रमाणे थोड्या प्रमाणात दारु पिणे देखील हानीकारक असल्याचे डब्ल्यूएचओचे युरोपमधील क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी डॉ. कॅरिना फरेरा-बोर्जेस यांनी म्हंटले आहे. 

दारुच्या व्यसनामुळे सात प्रकारचे कर्करोग होऊ शकतात असा इशारा डब्ल्यूएचओने दिला आहे. यामध्ये कोलन कर्करोग, स्तनाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग आणि अन्ननलिकेचा कर्करोग होम्याची भिती आहे.याशिवाय दारु पिण्याच्या सवयीमुळे किडनी तसेच लिव्हर खराब होण्याचा देखील धोका असतो. 

सतत दारु पित राहिल्यास मानसिक संतुलन देखील बिघडते. दारुच्या व्यसानाचा हृदयावर देखील परिणाम होतो. दारुमुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा धोका निर्माण होतो. तसंच अति दारू पित असल्यास, हृदयविकाराचा झटका लवकर येण्याची शक्यता असते. तसेच यामुळे रक्तामध्ये साखर कमी होते.