13 Jan 2023, 12:06 वाजता
भारतातील 1 हजार कर्मचाऱ्यांसह 18 हजार कर्मचाऱ्यांना अॅमेझॉन नारळ देणार
Amazon Cost Cutting : भारतातल्या 1 हजार कर्मचा-यांसह 18 हजार कर्मचाऱ्यांना अॅमेझॉन (Amazon)डच्चू देणार आहे. कपात करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी 5 महिन्यांचा पगार देणार आहे. तांत्रिक विभाग, HR तसंच अन्य विभागातल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने नारळ दिलाय. गुरुग्राम, बंगळुरु तसंच विविध शहरांतल्या कार्यालयातून कपातीला (Cost Cutting) सुरुवात करण्यात आली आहे. ज्या विभागांमध्ये कंपनीला तोटा होतोय, त्यांना सर्वात जास्त फटका बसलाय. कपात केलेल्या कर्मचा-यांमध्ये अनुभवी तसंच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कर्मचारी कपातीची प्रक्रिया पुढच्या आठवड्यापर्यंत सुरु राहणार आहे.
13 Jan 2023, 11:17 वाजता
Nana Patole Live | Maharashtra Political News : 'तांबेंनी पक्षासोबत फसवेगिरी केली', 'सर्व रिपोर्टस हायकमांडला पाठवले', 'दुसऱ्यांची घरं फोडून आनंद साजरा करतात', 'भाजपचं घरं फुटेल तेव्हा समजेल', नाना पटोले यांचा भाजपला इशारा
बातमी पाहा- Nana Patole संतापले! सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही; पटोले यांनी ठणकावलं
13 Jan 2023, 11:03 वाजता
Nana Patole Live | Maharashtra Political News : 'काँग्रेसनं सुधीर तांबेंना उमेदवारी दिली होती', 'सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाही', 'सत्यजित तांबेंनी काँग्रेसला धोका दिला', 'हायकमांड पुढील निर्णय घेणार', नाना पटोले यांचा सत्यजित तांबे यांना टोला.
13 Jan 2023, 10:54 वाजता
संदीप देशपांडेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Sandip Deshpande on Uddhav Thackeray : 'घरात बसलेल्यांनी कोरोनात बरोबर घोटाळा केला' मनसेच्या संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर टोला लगावलाय.तर 'मनपा प्रमुख म्हणून इक्बाल सिंह चहल जबाबदार', कोरोना भ्रष्टाचारावरुन मनसेचा आयुक्तांवर आरोप केलाय.
13 Jan 2023, 10:13 वाजता
पोलीस भरतीमध्ये अगोदर मैदानी चाचणी होणार
Mumbai Police Recruitment : पोलीस दलात भरती होणा-यांची यंदा लेखी परीक्षेआधी मैदानी चाचणी होतेय. त्यामुळे सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी वेळेत पूर्ण करण्याचं मोठं आव्हान मुंबई पोलिसांपुढे आहे. मुंबई पोलीस (Police) दलात शिपाई आणि चालकांच्या 8 हजार पदांसाठी भरती होतेय. त्यासाठी तब्बल 7 लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केलाय. मुंबईसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पोलीस दलात भरती सुरुय. मुंबईसोडून इतर ठिकाणी ही प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. मुंबईत 31 जानेवारीपासून 5 मैदानांमध्ये प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू केली जाणारेय.
13 Jan 2023, 09:36 वाजता
पुण्यात 13 अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल होणार
Pune Bogus Schools : बातमी झी २४ तासच्या बोगस शाळांविरोधातल्या (Bogus Schools) मोहिमेची. पुण्यात अनधिकृतपणे सुरु असलेल्या 13 इंग्रजी शाळांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिलेत. या शाळांची तपासणीही केली जाणार आहे. राज्य सरकारची मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा (English Schools)सुरु असल्याचा प्रकार समोर आला होता. पुढच्या 2 दिवसांत याप्रकरणात गुन्हे दाखल केले जातील. पुरंदर, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील शाळांचा यात समावेश आहे.
बातमी पाहा- zee 24 taas चा दणका! 13 बोगस इंग्रजी शाळांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
13 Jan 2023, 08:36 वाजता
नाशिकमध्ये बस आणि ट्रकची भीषण धडक, 10 जणांचा मृत्यू
Nashik Accident : सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ खासगी बस आणि ट्रकची भीषण धडक झाली आहे. अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय तर 12 जण जखमी झाल्याची माहिती. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डी कडे प्रवास करत होते.
बातमी पाहा- साईभक्तांच्या बसला भीषण अपघात, 10 जण ठार तर 12 गंभीर
13 Jan 2023, 08:25 वाजता
म्हाडाचा मनमानी कारभार आणि उधळपट्टीवर निर्बंध
Devendra Fadnavis on Mhada : म्हाडाच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि उधळपट्टीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)लगाम घातलाय. 50 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या कोणत्याही कामांसाठी आता सरकारची पूर्वमान्यता घेणं आवश्यक करण्यात आलंय. प्रकल्पाच्या मूळ किंमतीमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होणार असेल तर त्यासाठीही सरकारची मान्यता घेण्याचे आदेश म्हाडाला देण्यात आलेत. गतिमान कारभारासाठी म्हाडाच्या (Mhada)अधिकाऱ्यांना मंत्र्यांचे अनेक अधिकार देण्यात आले होते. मात्र अधिकाऱ्यांकडून त्याचा गैरवापर होताना दिसतोय. म्हणूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घातलाय.
13 Jan 2023, 08:02 वाजता
त्र्यंबकेश्वराचं मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं
Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वराचं मंदिर भाविकांसाठी आजपासून खुलं झालंय. (Trimbakeshwar) ज्योतिर्लिंगाचं संवर्धन आणि मंदिराच्या देखभालीसाठी 5 ते 12 जानेवारीपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ठरलेल्या वेळेत संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. 8 दिवसांत भारतीय पुरातत्त्व खात्याकडून शिवलिंगावर वज्रलेप करण्यात आला. यादरम्यान त्रिकाल पूजा, प्रदोष पुष्पपूजा असे नित्यपाठ सुरू होते मात्र भाविकांना दर्शनासाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. मात्र आज संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे भाविकांना दर्शन घेण्यात येतंय.
13 Jan 2023, 07:44 वाजता
मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार
Maharashtra Cold : मुंबईसह राज्यभरात थंडीचा (Cold)कडाका वाढणार आहे. हवामान खात्यानं अशी शक्यता वर्तवलीय. उत्तरेकडील शीत लहरींमुळे राज्यात हुडहुडी भरलीय. मुंबईत तापमानाचा पारा 16 अंशांवर घसरलाय. मुंबईसह राज्यभर पुढील 4 चार दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे.