13 Jan 2023, 23:53 वाजता
मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीचं समन्स
ED Summons to Commissioner Iqbal Singh Chahal : कोरोना काळातील वैद्यकीय उपकरण घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) हे ईडीच्या रडारवर आले आहेत. चहल यांना ईडीनं समन्स बजावलाय. सोमवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीनं चहल यांना दिले आहेत. त्यामुळे चहल यांच्या मागे आता ईडीच्या चौकशीचा ससेमीरा सुरू झालाय. ईडीनं कोरोना काळातील घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावल्याची SUPER EXCLUSIVE बातमी 'झी २४ तास'नं गुरूवारीच दिली होती. त्याच बातमीवर आता शिक्कामोर्तब झालंय.
बातमी पाहा - https://bit.ly/3ZAeJod
13 Jan 2023, 22:43 वाजता
शिवसेना कुणाची 17 जानेवारीला ठरणार
Shivsena Party Symbol | Maharashtra Political News : महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सर्वात मोठी घडामोड. शिवसेनेचं (Shivsena) भवितव्य 17 जानेवारीला ठरणार आहे. शिवसेना कुणाची याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोग 17 जानेवारीला देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'झी २४ तास'ला दिलीय. एवढंच नव्हे तर निवडणूक आयोग शिंदे गटाला (Eknath Shinde Group) कौल देण्याची शक्यता असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.
बातमी पाहा - https://bit.ly/3iz7PPF
13 Jan 2023, 20:53 वाजता
हिंगोलीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण
Farmer's Agitation | Marathi News LIVE Today : हिंगोलीच्या(Hingoli) सेनगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Farmers Association)कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीचं कार्यालय फोडलं. आयसीआयसीआय लोम्बार्डच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांनी खुर्च्या, टेबल आणि इतर साहित्याची तोडफोड केली. पीक विम्याचा लाभ मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले होते. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजून मदत मिळालेली नाही. याबाबत अर्जविनंत्या करूनही विम्याची रक्कम पदरात न पडल्यानं शेतकरी आक्रमक झाले.
बातमी पाहा - https://bit.ly/3w4c1tP
13 Jan 2023, 19:13 वाजता
MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळलं
MPSC Students Protest : MPSCची तयारी करणारे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेत. परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केलाय. त्याविरोधात विद्यार्थी राज्यभर आंदोलन करतायत. सकाळी दहा वाजल्यापासून राज्यभरात आंदोलन पुकारलंय. पुण्यात(Pune) MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळलं. अलका चौकात विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच. आंदोलनाला सरकार जबाबदार असल्याचा आरोप आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी(Atul Londhe) केलाय. उपराजधानी नागपुरातही (Nagpur) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर NSUI आणि MPSC विद्यार्थी आंदोलन करतायत. नागपुरात काँग्रेस आमदार अभिजीत वंजारींच्या(Abhijeet Vanjari) नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येतंय.
संभाजीनगरमध्ये (SambhajiNagar) महात्मा फुले चौकात MPSCचे विद्यार्थी मोठ्या संख्येने जमलेत. काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेत. तर कोल्हापुरातल्या(Kolhapur) सायबर चौकात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करा अशी विद्यार्थ्यांची मागणी केलीय. दरम्यान याबाबत सरकार योग्य तो निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी सांगितलं. MPSC विद्यार्थी आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, अजित पवारांनीही (Ajit Pawar)घेतली आंदोलनाची दखल. अजित पवार उद्या शिंदें-फडणवीसांना भेटणार.
बातमी पाहा - https://bit.ly/3iBMPaU
13 Jan 2023, 17:26 वाजता
खोके सरकारकडून बीएमसीची लूट -आदित्य ठाकरे
Aditya Thackeray Live | Maharashtra Political News : शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबई महापालिकेच्या रस्त्यांच्या कंत्राटावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यावर जोरदार टीका केलीय. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात मोगलाई सुरू असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केलीय. बीएमसी रस्ते कंत्राटावरून त्यांनी बीएमसीच्या अधिका-याला ईडीची नोटीस आली असेल तर होऊ द्या चौकशी असं आव्हानही आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला दिलंय. खोके सरकारकडून बीएमसीची लूट, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर घणाघात.
बातमी पाहा - https://bit.ly/3GCgJUA
13 Jan 2023, 15:00 वाजता
आचारसंहिता भंग प्रकरणी आमदार रवी राणांना दणका
Ravi Rana : आचारसंहिता भंग प्रकरणी आमदार रवी राणांना (Ravi Rana) जिल्हा प्रशासनाने दणका दिलाय. कृषी महोत्सव बंद करण्याचे आदेश दिले असून, संध्याकाळपर्यंत मैदान रिकामं करण्यास सांगितलंय. राणांच्या युवा स्वाभिमानकडून 12 जानेवारी ते 16 जानेवारीदरम्यान अमरावतीत कृषी महोत्सव आयोजन करण्यात आले होतं.. गेटवर पंतप्रधान मोदी, शहा, यांचे फोटो असल्याने जिल्हा प्रशासनाने कारवाई करीत महोत्सव बंद करण्याचे आदेश दिलेयत. जिल्ह्यात आचारसंहिता लागली असल्याने ही कारवाई करण्यात आलीय.ही कारवाई करण्यास मविआनं दबाव आणल्याचा आरोप रवी राणांनी केलाय.
13 Jan 2023, 14:32 वाजता
कोरोना काळ उद्धव सरकारच्या कमाईचं साधन- किरीट सोमय्या
Kirit Somaiya on Corona : कोरोना काळ म्हणजे उद्धव ठाकरे सरकारच्या कमाईचं साधन होतं असा आरोप किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केलाय.. कोरोना काळात केलेल्या काळ्या कमाईचा सर्वांनाच हिशोब द्यावा लागणार... किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) असो किंवा संजय राऊत (sanjay raut) नाहीतर इक्बाल चहल असोत... काळ्या कमाईचा हिशोब घेणारच असा इशारा किरीट सोमय्यांनी दिलाय.
13 Jan 2023, 13:44 वाजता
वेणूगोपाल धूतांची अटक बेकायदेशीर, वकिलांचा दावा
ICICI Bank-Videocon Loan Case : आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)घोटाळा प्रकरणी वेणूगोपाल धूत यांच्या (Venugopal Dhoot) बेकायदेशीर अटक याचिकेवर युक्तीवाद पूर्ण झालाय. मुंबई हायकोर्टाने निकाल राखून ठेवलाय. व्हिडिओकॉन (Videocon) समूहाचे व्यवस्थापक वेणूगोपाल धूत यांची अटक बेकायदेशीर असल्याचा त्यांच्या वकिलांचा दावा आहे...तर धूत यांनी तपासात सहकार्य केलं नसल्याने त्यांना अटक केल्याचा दावा सीबीआयच्या वकिलांचा युक्तीवादादरम्यान केला. याप्रकरणी काही वेळात निकाल येण्याची शक्यताय. त्यानंतरच धूत यांना जामीन मिळणार की पुन्हा जेल होणार हे कळेल.
13 Jan 2023, 13:24 वाजता
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर
ST Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर. एसटी कर्मचाऱ्यांचा आजच पगार (Salary) होणार. पगारासाठी राज्य सरकारकडून 300 कोटी वितरित. एसटी कर्मचाऱ्यांची (ST Employees)संक्रात गोड होणार.
बातमी पाहा- एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी बातमी, सरकारकडून 300 कोटी वितरित
13 Jan 2023, 13:19 वाजता
मुंबई उच्च न्यायालयाचा रॅपिडो कंपनीला मोठा दणका
Rapido Closed : रॅपिडो कंपनीला मोठा दणका. पुण्यातली रॅपिडो (Rapido Bike) बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करा. मुंबई हायकोर्टाचे आदेश, रॅपिडो कंपनीची रिक्षा, डिलिव्हरी या सेवाही विनापरवाना असल्याचं स्पष्ट. सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश. जानेवारीपर्यंत राज्यभरातील सर्व सेवा बंद करण्यास कंपीनीची तयारी, पुढील शुक्रवारी पुन्हा सुनावणी.