Maharashtra Political News | Live Marathi News : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Political News | Live Marathi News : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

13 Jan 2023, 07:24 वाजता

एसटीचे 90 हजार कर्मचारी वेतनविना 

ST Employees : जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार (Salary) झालेला नाही. त्यामुळे ते आक्रमक झालेत. संपादरम्यान पगारासाठी 4 वर्षे पूर्ण रक्कम देण्याचं, तसंच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचं सरकारनं मान्य केलं होतं. मात्र ते पाळण्यात येत नसल्यामुळे 90 हजार एसटी कर्मचारी (ST Employees) नाराज आहेत. यासंदर्भात एसटी संघटनेनं महामंडळाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल करावी लागेल, अशी नोटीस बजावलीय. सरकारकडून अपुरा आणि वेळेवर मिळत नसलेल्या निधीमुळे कर्मचा-यांचं वेतन लांबणीवर पडू लागलंय.

बातमी पाहा-  एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेत, संघटनेने उचलले हे मोठे पाऊल