PM Narendra Modi Visit Mumbai Highlights: पंतप्रधान मोदी यांचा मेट्रोने प्रवास, मेट्रोत विद्यार्थ्यांशी संवाद

Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत 40 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ.. ( Political News) मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण करण्यात आलं (Mumbai Metro) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते झालं. (Mumbai News in marathi) 

PM Narendra Modi Visit Mumbai Highlights: पंतप्रधान मोदी यांचा मेट्रोने प्रवास, मेट्रोत विद्यार्थ्यांशी संवाद

PM Narendra Modi Mumbai Visit Highlights  : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण होईल. (Mumbai Metro Inaugration) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. (Mumbai News in marathi) 

19 Jan 2023, 17:27 वाजता

काही लोकांनी गद्दारी केली, उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मोदींसमोर उद्धव ठाकरेंना टोला. त्या बैठकीला मोदी देखील उपस्थित होते, असं म्हणत फडणवीसांचा भर सभेत गौप्यस्फोट!

19 Jan 2023, 17:25 वाजता

काही जणांनी गद्दारी केल्याने सत्ता गेली होती, पण राज्यात पुन्हा एकदा डबल इंजिन सत्ता आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान मोदींसमोर उद्धव ठाकरे यांना टोला

19 Jan 2023, 17:19 वाजता

पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसीत दाखल झाले असून इथे त्यांची जाहीर सभा होणार आहे,  व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंतप्रधानांचा सत्कार

19 Jan 2023, 17:03 वाजता

पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल

पंतप्रधान मोदींचं मुंबईत आमगन झालं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. मोदींचा ताफा बीकेसीच्या दिशेने रवाना झाला आहे.

19 Jan 2023, 16:58 वाजता

बीकेसी मैदानात समर्थकांची गर्दी

बीकेसीमधील मैदानावर पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी भाजपा आणि शिंदे गट समर्थकांची मोठी गर्दी. पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून भाजपा आणि शिंदे समर्थक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे.

19 Jan 2023, 16:13 वाजता

शिंदे-फडणवीस विमानतळाकडे रवाना

PM Modi In Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 4 वाजून 14 मिनिटांनी विमानतळावर पोहोचणार आहेत. मोदींचं स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई विमानतळाकडे रवाना झाले आहेत.

19 Jan 2023, 16:08 वाजता

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मेट्रो 7 चं त्यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. परंतु मोदींच्या स्वागताआधीच बिकेसीतली स्वागत कमान कोसळली आहे. यासाठी गेल्या आठवड्याभरापासून शिंदे-फडणवीस सरकारनं जोरदार तयारी केली आहे.

19 Jan 2023, 16:02 वाजता

PM Modi At BKC, Mumbai: पंतप्रधान मोदींची बीकेसीमध्ये सभा होणार आहे. मात्र पंतप्रधानांच्या स्वागताआधीच बीकेसीमधील स्वागत कमान कोसळली आहे. या अपघातामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. बीकेसीमध्ये मागील आठवड्यापासून शिंदे-फडणवीस सरकारनं जोरदार तयारी केली आहे. मात्र ऐन कार्यक्रमाच्या आधीच ही दुर्घटना घडल्याने काही वेळ या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पण कोणीही जखमी झालं नसून ही कमान बाजूला करण्यात आली आहे.

19 Jan 2023, 15:57 वाजता

Narendra Modi Mumbai Visit LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. ते मुंबईकडे निघाले आहेत. सायंकाळी 4.14 वाजता मुंबईत आगमन होणार आहे.

19 Jan 2023, 15:50 वाजता

हॉस्पिटल भूमिपूजनावरुन काँग्रेस - भाजपात श्रेयाची लढाई

Narendra Modi Mumbai Visit : नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील विविध विकास कामांचं भूमिपूजन देखील करण्यात येत आहे. त्यात भांडुप येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचा भूमिपूजनाचा देखील समावेश आहे. परंतु सध्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन श्रेय वादाची लढाई सुरु झाली आहे. सप्टेंबरमध्ये काँग्रेस नगरसेविका उषा कोपरकर आणि सुरेश कोपरकर यांनी या कामाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर या कामाला सुरुवात देखील झाली आहे मुंबई महानगरपालिकेच्या फंडातून हे काम केले जात आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी आम्ही केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी स्व हस्ते हा भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतला असून या सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी नेमके कोणी प्रयत्न केले याची कल्पना जनतेला आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी दिली आहे.