PM Narendra Modi Mumbai Visit Highlights : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण होईल. (Mumbai Metro Inaugration) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. (Mumbai News in marathi)
19 Jan 2023, 15:48 वाजता
ठाण्यातून 7500 कार्यकर्ते रवाना
Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ठाण्यातून साडेसात हजार कार्यकर्ते रवाना झालेत.शहराच्या विविध भागातून सभास्थानी म्हणजेच बिकेसी येथे जाण्यासाठी बसेस ची व्यवस्था करण्यात आली आहे. पारंपरिक वेशात फेटे परिधान करुन शहराच्या विविध भागांतून कार्यकर्ते बिकेसीला रवाना होतायत. यात विशेष लक्ष वेधून घेतलंय ते ठाण्यातील महागिरी कोळीवाडा येथील कोळी बांधवांनी. येथील कोळी बांधव आपली पारंपरिक कोळी वेषभूषा परिधान करून कोळी गाण्यांवर थिरकत मोदींच्या सभेला रवाना झालेत. ठाण्याचे आमदार संजय केळकरही त्यांच्यासोबत सहभागी झाले आहेत.
19 Jan 2023, 15:46 वाजता
नवी मुंबईमधून शिंदे गटाच्या 120 बस रवाना
Narendra Modi Mumbai Visit : मोदी यांची मुंबईतील बिकेसी येथे सभा होणार आहे. यासाठी नवी मुंबईमधून मोठ्या प्रमाणात बस मुंबई कडे रवाना झाल्या आहेत. बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून नवी मुंबईमधून 120 बस रवाना करण्यात आल्या आहेत तर भाजप कडून 95 बस रवाना करण्यात आल्या आहेत. ऐरोली टोल नाका येथून बिकेसी येथे रवाना झाल्या आहेत.
19 Jan 2023, 15:40 वाजता
शिंदे गटाचे कार्यकर्ते सभेसाठी रवाना
Narendra Modi Mumbai visit :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ठाण्यातील भाजप सोबतच बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेही जय्यत तयारी केल्याचे दिसून आले. ठाण्यातून 20 पेक्षा जास्त एसटी बसेसमधून शेकडो कार्यकर्ते मोदींच्या सभेसाठी रवाना झालेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या किसन नगर प्रभागातूनही शिंदे गटाचे कार्यकर्ते सभेसाठी रवाना झालेत.
19 Jan 2023, 13:21 वाजता
मोदी यांचा हा दौरा राजकीय हेतूने प्रेरीत - दानवे
Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा राजकीय हेतूने प्रेरीत आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आमची सत्ता असताना या कामांची प्रक्रिया पूर्ण झालेली होती. केवळ उद्धाटन, भूमीपूजन करुन ते या कामांचे श्रेय घेत आहेत. मोदींच्या कार्यक्रमात 'बेगाने शादी मै अब्दुल्ला दिवाना' असं शिंदे गटाचे झाले आहे. ते केवळ नाचायला जात आहेत. महाविकास आघाडीत कुठलाही सावळागोंधळ नाही, असे ते म्हणाले.
19 Jan 2023, 13:18 वाजता
गुंदवली मेट्रो स्थानक फुलांनी सजवले
Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईतील दोन मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. मोदी मेट्रो 7 आणि 2 याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे अंधेरी येथील गुंदवली मेट्रो स्थानकात फुलांची आरस करण्यात आलेली आहे.
19 Jan 2023, 13:12 वाजता
मोदी दौरा : भाजप, शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शन
Narendra Modi Mumbai visit :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी कल्याण - डोंबिवलीतील भाजप, शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शन. एस महामंडळच्या शंभर गाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. दोन हजार हून अधिक कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. बीकेसी येथे जाहीर होणार आहे. या सभेसाठी भाजपसह शिंदे गटाने देखील जय्यत तयारी केली आहे.सभेच्या निमित्ताने भाजप व शिंदे गट जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे मुंबई ठाणे सह कल्याण डोंबिवलीमधून देखील तब्बल 100 हून अधिक बसेस सभेसाठी रवाना होणार आहेत.
19 Jan 2023, 11:54 वाजता
पंतप्रधान मोदी यांचा नियोजित मुंबई दौरा कार्यक्रम
Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन 4 वाजून 14 मिनिटांनी मुंबईत होणार आहे. 4.15 वाजता मुंबईतील बीकेसी ग्राउंडकडे रवाना होणार आहेत. 7.20 वाजता मोदी मुंबई विमानतळावरुन प्रयाण करतील. यावेळी पंतप्रधान मोदी हे मुंबईत एक रोड शो सुद्धा करणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम पाहा
19 Jan 2023, 11:52 वाजता
... म्हणून मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडली
Narendra Modi in Mumbai :पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी आणखी कितीवेळा कॅम्पसमधील भिंती तोडणार, असा प्रश्नही विद्यार्थी संघटनाकडून करण्यात आलाय. पार्कींगसाठी भिंत तोडण्यात आली आहे. मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात डिजीटल पद्धतीने विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे.
19 Jan 2023, 11:16 वाजता
मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचे ट्वीट
Narendra Modi in Mumbai : मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्वीट करुन माहिती दिली आहे. मी उद्या मुंबईत असेन. 38 हजार कोटी रुपयांचा खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे.
मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल.
— Narendra Modi (@narendramodi) January 18, 2023
19 Jan 2023, 11:12 वाजता
खासदार संजय राऊत यांनी डिवचलं
Narendra Modi Mumbai Visit: मुंबई दौऱ्यावर येणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी डिवचलं आहे. सीमावर्ती भागातल्या मराठी बांधवांवर अत्याचार करु नका, ही सूचना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना करा. त्याची महाराष्ट्रात घोषणा करा असं आवाहनही राऊतांनी केले आहे. मुंबईत येण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकचा दौरा करणार आहेत. सीमावादावरुन भाजप आणि ठाकरे गटामध्ये वाद आधीच पेटलाय.. त्यात राऊतांनी असं आवाहन करत आणखीन डिवचलंय... शिवसेनेच्या काळात मुंबई महापालिकेने जी कामं केली त्याचंच उद्घाटन मोदी करणार असल्याचा पुनरुच्चारही राऊतांनी केलाय.