PM Narendra Modi Mumbai Visit Highlights : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण होईल. (Mumbai Metro Inaugration) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. (Mumbai News in marathi)
19 Jan 2023, 10:35 वाजता
मोदी यांची मुंबईतल्या बीकेसीत जाहीर सभा, ...पण
Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) आज मुंबईतल्या बीकेसीत जाहीर सभा आहे. मात्र त्याआधीच चिंता वाढवणारी बातमी. कारण बीकेसीतली हवेची गुणवत्ता सर्वात वाईट असल्याचं समोर आलंय. बीकेसीमध्ये हवेची गुणवत्ता 343 तर मुंबई शहराच्या हवेची गुणवत्ता 316 इतकी नोंदवण्यात आलीय. वायू प्रदुषणाची नोंद करणा-या सफर संस्थेच्या माध्यमातून ही माहिती समोर आलीय. मुंबईतल्या गाड्यांचं प्रदुषण, उडणारी धुळ, इमारतींची बांधकाम याचा परिणाम हवेवर होतोय. तर धुळ, धुके आणि धूर यांच्या मिश्रणानं तयार होणारं धुरकंही मुंबईवर पसरलंय. वायूप्रदुषणामुळे श्वसनाच्या आजारांत वाढ होण्याची शक्यता आहे. तेव्हा बाहेर पडताना काळजी घ्या असं आवाहन डॉक्टर्सनीही केले आहे.
19 Jan 2023, 10:29 वाजता
मोदी आणि बाळासाहेबांच्या फोटोचे बॅनर्स
Narendra Modi in Mumbai : आज मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे. त्या पार्श्वभूमीवर अज्ञाताने मोदी आणि बाळासाहेबांच्या फोटोचे बॅनर्स लावले आहेत. या फोटोत मोदी बाळासाहेबांपुढे मान झुकून नमस्कार करताना दिसत आहेत. दक्षिण मुंबईतील गिरगाव, चर्नी रोड परिसरात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. हे फोटो लावून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान मोदी यांचा मुंबई दौरा, वाहतुकीत मोठा बदल
Narendra Modi in Mumbai : PM मोदी आज मुंबईत, 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ
Narendra Modi यांच्या मुंबई दौऱ्यात तगडा पोलीस बंदोबस्त, 'इतके' कर्मचारी तैनात
PM मोदी यांच्या मुंबई दौऱ्याआधीच मोठी घडामोड, BJP चा विजयी रथ रोखण्यासाठी 'या' व्यक्तीकडे जबाबदारी?
Mumbai Metro : PM मोदी मेट्रोसह मुंबईतील 'इतक्या' कोटींच्या खर्चाच्या कामांचे करणार उद्घाटन
19 Jan 2023, 10:19 वाजता
मुंबईत तब्बल 4500 पोलीस तैनात
Narendra Modi in Mumbai : शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पहिल्यांदाच मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी हे मुंबईत एक रोड शो सुद्धा करणार आहेत. मोदी (Narendra Modi Mumbai Visit) यांचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून कंबर कसली आहे. नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत दौऱ्यात मुंबई पोलिसांच्या 900 अधिकाऱ्यांसह साडेचार हजार पोलिसांचा (mumbai police) फौजफाटा तैनात असणार आहे. संपूर्ण परिसरात पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान ड्रोन, पराग्लाइडर्स तसेच रिमोट कंट्रोल लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.
19 Jan 2023, 10:14 वाजता
मुंबईत वाहतूक व्यवस्थेत असा बदल
1) पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी वरळी सी लिंककडून बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने एमएमआरडीए जंक्शन येथून धारावी टी जंक्शनवरुन कुर्ल्याकडे तसेच पूर्व द्रुतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील.
2) संत ज्ञानेश्वर मार्गावरुन आयकर विभाग जंक्शनकडून पुढे बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने गुरुनानक रुग्णालयाजवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथून कलानगर मार्गे सरळ पुढे धारावी टी जंक्शनवरुन कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील.
3) खेरवाडी शासकीय वसाहत मनाकिया पॅलेस, वाल्मिकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने, वाल्मिकी नगर येथून यू टर्न घेऊन शासकीय वसाहत मार्ग कलानगर जंक्शन येथून सरळ पुढे धारावी टी जंक्शन पुढेवरुन कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील.
4) तसेच सूर्वे जंक्शन आणि रजाक जंक्शनवरुन पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सी लिंकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथून सीएसटी रोडने मुंबई विद्यापीठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसमुखा जंक्शन येथून पुढे इच्छितस्थळी मार्गस्थ होती.
19 Jan 2023, 10:14 वाजता
मोदींच्या दौऱ्यासाठी 250 हून अधिक एसटीचे आरक्षण
Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी 250 हून अधिक एसटी बसेसचं बुकिंग करण्यात आलंय. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातून एसटी बसेस सुटणारेय. सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिलीय. दसरा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा एसटी बसचं मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आले आहे.
19 Jan 2023, 10:12 वाजता
Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत येणार आहेत. (Mumbai News in Marathi) या दौऱ्यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. संध्याकाळी मुंबईतील बीकेसीवर सभा होणार आहे. या सभेत मोदी काय बोलणार याचीही उत्सुकता आहे.
19 Jan 2023, 10:10 वाजता
PM Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. ते मुंबईतील 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. ( Political News) मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण होईल. (Mumbai Metro) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. (Mumbai News in marathi)
पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही मोदींच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बीकेसी मैदानावर संध्याकाळी भव्य सभाही आयोजित करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबईवर ठाकरेंचं राज आहे. यंदा मात्र मुंबई जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तेव्हा मोदींच्या हस्ते मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचाच नारळ फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4