राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Political News) धनुष्यबाण (Dhanushyaban) कुणाचा ठाकरेंचा की शिंदेंचा याचा अंतिम फैसला आता 30 जानेवारीला होणार आहे. (Shiv Sena) आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पूर्ण झाली. (Uddhav Thackeray) निवडणूक आयोगाने दोनही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांचा आज युक्तीवाद पूर्ण झाला. आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं यावर आयोग 30 जानेवारील अंतिम निर्णय देणार आहे. (Eknath Shinde)
20 Jan 2023, 12:39 वाजता
'फक्त आमदार आणि खासदार मिळून शिवसेना होत नाही'
Ambadas Danve on Dhanushyaban Symbol Election Commission Hearing : शिवसेनेकडून होणारा युक्तीवाद जनतेच्या मनातला आहे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. शिवसेनेकडून होणारा युक्तीवाद जनतेच्या मनातून आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मागे शिवसैनिक आहेत. फक्त आमदार आणि खासदार मिळून शिवसेना होत नाही, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे. शिवसेना धनुष्यबाण चिन्हाविषयीची सुनावणी कोर्टात झाली तर शिवसेनेला नक्कीच न्याय मिळेल, असा दावा यावेळी अंबादास दानवे यांनी केला आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करते की काय, असा जनतेच्या मनात संशय निर्माण होत असल्याचेही दानवे म्हणाले.
20 Jan 2023, 12:35 वाजता
शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबत काय होणार?
Shiv Sena Dhanushyaban Symbol EC Hearing : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. (Maharashtra Political Crisis) दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आज शुक्रवारी फैसला होण्याची शक्यता आहे. त्याआधी निवडणूक आयोगाने मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाला पेटती मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार निशाणी दिली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे.
20 Jan 2023, 12:29 वाजता
दोन्ही गटाकडून मोठा दावा
Shiv Sena Dhanushyaban Symbol EC Hearing : दरम्यान, शिवसेना कोणाची हा वाद सुरु असताना जर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला संघटनात्मक निवडणुकीला परवानगी दिली तर ठाकरे गटाच्या अस्तित्वाला मान्यता दिल्यासारखे होईल. त्यामुळे आज निवडणूक घेण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे किंवा नाही, याची मोठी उत्सुकता आहे. तसेच धनुष्यबाण चिन्हाबाबत काय फैसला होणार याकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान, मूळ शिवसेनेच्या एबी फॉर्मवर शिंदे गटातील आमदार निवडून आले आहेत. याबाबत मागच्या सुनावणीवेळी ठाकरे गटाने मजबूत युक्तिवाद केला होता. ठाकरे गटाने शिवसेनेच्या संविधानाचा हवाला देत शिवसेनेच्या संविधानात मुख्य नेता पदच नाही, असा दावा केला होता. त्यामुळे शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. तर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदावरच आक्षेप घेतला होता.
20 Jan 2023, 12:23 वाजता
ठाकरे पक्षप्रमुख पदावर राहणार का?
Shiv Sena Dhanushyaban Symbo Election Commission Hearing : उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ येत्या 23 जानेवारी रोजी संपत आहे आहे. त्यामुळे ठाकरे गटाने प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे मागितली आहे. त्यावरही निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला नाही. निवडणूक आयोग आज त्यावरही निर्णय देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
20 Jan 2023, 08:22 वाजता
धनुष्यबाण कुणाचा?, काय झाला युक्तीवाद...
Shiv Sena Dhanushyaban Symbo Election Commission Hearing : धनुष्यबाण कुणाचा ठाकरे यांचा की शिंदे यांचा या प्रश्नाभोवती गेल्या चार महिन्यांपासून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वाद शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. तर शिंदे गटाकडूनही वकिलांची मोठी फौज युक्तिवादासाठी हजर होती. 'शिंदे गटाने दाखल केली कागदपत्र ही जुनी आहे, महेश जेठमलानी यांनी केलेला दावा हा बोगस आहे. शिवसेनेमध्ये जी फूट पडली आहे त्याचा परिणाम पक्षावर होणार नाही त्यामुळे ही फूट ग्राह्य धरू नये. ही फूट काल्पनिक असू शकते. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच ही खरी शिवसेना आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत निर्णय घेऊ नये, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता.
20 Jan 2023, 08:17 वाजता
मूळ शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार?
Shiv Sena Dhanushyaban Symbol Election Commission Hearing : शिवसेना कुणाची, उद्धव ठाकरे यांची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, याचा आज फैसला होणार आहे. मूळ शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला देणार याची उत्तरे आज मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज याबाबत महत्त्वाची सुनावणी होणार आहे.
ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी कागदपत्रं सादर केल्यानंतर निवडणूक आयोग काय निर्णय देतं याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुका घेण्यासाठी आणि प्रतिनिधी सभा बोलावण्यासाठी परवानगी देण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.