तीन नगरपालिका निवडणूक निकाल २०१७

तीन नगरपालिका निवडणूक निकाल २०१७

राज्यातील लातूर,परभणी आणि चंद्रपूर नगरपालिका मतमोजणीला सुरुवात

21 Apr 2017, 12:53 वाजता

लातूर मनपा : भाजप १८, काँग्रेस १४, राष्ट्रवादी काँग्रेस ०१ जागेवर विजयी.

21 Apr 2017, 12:52 वाजता

परभणी मनपा :  परभणी प्रभाग 3  अ मधून काँग्रेसचे अनिता रवींद्र सोनकांबळे विजयी,, ब मधून काँग्रेससचे शेख फरहत सुलताना शेख अब्दुल मुजाहेद विजयी, क मधून काँग्रेसचे खान मेहमूद मजीद विजयी तर ड मधून शिवसेनेचे अमरदीप रोडे विजयी

21 Apr 2017, 12:51 वाजता

लातूर मनपा : प्रभाग ०६ आणि प्रभाग १८ मधून भाजपचे सर्व ०७ उमेदवार विजयी, काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी उपमहापौर सुरेश पवार विजयी , भाजप ०७, तर काँग्रेस ०१ जागेवर विजयी

21 Apr 2017, 12:50 वाजता

चंद्रपूर मनपा : निकाल + आघाडी- भाजप 23, काँग्रेस 9,  रा.कॉ. 2, अपक्ष 1

21 Apr 2017, 12:48 वाजता

लातूर मनपा : काँग्रेस २४  ठिकाणी आघाडीवर, भाजप ३८ ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर आघाडीवर.

21 Apr 2017, 12:47 वाजता

चंद्रपूर मनपा :  प्रभाग 10 निकाल काँग्रेस -3, राष्ट्रवादी 1, रा.कॉ.चे माजी न.प.अध्यक्ष दीपक जयस्वाल विजयी

21 Apr 2017, 12:44 वाजता

परभणी मनपा : काँग्रेस २१ तर राष्ट्रवादी काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर
चंद्रपूर मनपा : भाजप १२ तर काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर

21 Apr 2017, 12:44 वाजता

लातूर मनपा : प्रभाग १० अ मधून काँग्रेसच्या कांचन रत्नदीप अजनिकर जवळपास एक हजार मतांनी विजयी

21 Apr 2017, 12:19 वाजता

लातूर मनपा : भाजप ३४ तर काँग्रेस २४ जागांवर आघाडीवर.
चंद्रपूर मनपा : भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, भाजप ८ तर काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर 

21 Apr 2017, 11:50 वाजता

लातूर मनपा : भाजपला सत्तेची संधी, बहुमतासाठी केवळ ३ जागांची गरज, काँग्रेसचा पुरता सफाया, आमदार अमित देशमुख यांना जोरदार धक्का