WTC 2021 Final 2nd Day Highlights | खराब प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात, विराट-रहाणे मैदानात

भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे सर्व अपडेट्स

WTC 2021 Final 2nd Day Highlights | खराब प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात, विराट-रहाणे मैदानात

मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे सर्व अपडेट्स

19 Jun 2021, 23:10 वाजता

खराब प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळं थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या दिवसात केवळ 64.4 ओव्हर्सचाच खेळ होऊ शकला. टीम इंडियाने खेळ स्थगित होण्यापर्यंत  64.4 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावून 146 धावा केल्या. दरम्यान सामन्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली करणार आहेत.  

19 Jun 2021, 22:16 वाजता

खराब प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्राचा खेळ स्थगित करण्यात आला. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.  खेळ थांबला तोपर्यंत टीम इंडियाने  64.4 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावून 146 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या जोडीने चौथ्या विकेटसाठी नाबाद 58 धावांची भागीदारी केली आहे.  

दरम्यान सामन्यात सातत्याने येणाऱ्या समस्यांमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण तयार झाले आहे. अनेक नेटीझन्स मीम्सद्वारे आयसीसीवर टीका करत आहेत.   

19 Jun 2021, 20:49 वाजता

टीम इंडियाने टी ब्रेकपर्यंत 3 विकेट्स गमावून 120 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे ही जोडी मैदानात नाबाद खेळत आहे. विराट 35 तर रहाणेने 13 धावा केल्या आहेत. 

19 Jun 2021, 18:45 वाजता

टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा आऊट झाला आहे. पुजाराला टेन्ट बोल्टने 8 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं. पुजारानंतर विराट कोहलीला साथ देण्यासाठी अजिंक्य रहाणे मैदानात आला आहे. 

 

19 Jun 2021, 16:33 वाजता

टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. संयमी सुरुवातीनंतर रोहित शर्माच्या रुपात भारताला पहिला झटका लागला आहे. रोहितला कायले जेमिन्सनने टीम साऊथीच्या हाती कॅच आऊट केलं. रोहितने 68 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 34 धावांची खेळी केली. रोहितनंतर  चेतेश्वर पुजारा मैदानात आला आहे.  

19 Jun 2021, 16:20 वाजता

रोहित शर्मा-शुबमन गिल सलामी जोडीने संयमी सुरुवात केली आहे. या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे. या जोडीकडून टीम इंडियाला मोठ्या आणि चांगल्या भागीदारीची अपेक्षा आहे.