ZP Election Result 2021 LIVE Update : झेडपीचा रणसंग्राम, कोण मारणार बाजी?

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक निकाल आज

ZP Election Result 2021 LIVE Update : झेडपीचा रणसंग्राम, कोण मारणार बाजी?

मुंबई : ZP Election Result 2021 LIVE Update :जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वात जलद निकाल आपण  'झी 24 तास' आणि '24तासडॉटकॉम'वर पाहू शकता. 

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी राज्यात सहा जिल्हा परिषदात पोटनिवडणूक झाली. आज त्याचा निकाल लागणार आहे. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार, पालघर या सहा जिल्हा परिषदांसाठी काल मतदान झालं. पोटनिवडणुकीसाठी सुमारे 63 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं सहा जिल्हा परिषदांमध्ये 229 जागा रिक्त झाल्यात. रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येत आहेत. पोटनिवडणुकांच्या निकालांवर नागपूर, अकोला आणि वाशीम जिल्हा परिषदांच्या सत्तेचे भवितव्य ठरणार आहे. तर पालघरमधील निकालाने राजकीय चित्र मात्र बदलणार नाही.

 

6 Oct 2021, 12:48 वाजता

वाशिम : 
जिल्हा परिषद 14- 14
भाजप-02
शिवसेना-01
राष्ट्रवादी-05
काँग्रेस-02
वंचित - 02
इतर-02

6 Oct 2021, 12:45 वाजता

धुळे 
जिल्हा परिषद 
गट निकाल

 भाजप - 7
काँग्रेस - 01
एस सी पी - 2
शिवसेना - 1

6 Oct 2021, 11:55 वाजता

वाशिम- उकळीपेन जिल्हा परिषद गटातून शिवसेचे उमेदवार सुरेश मापारी विजयी ...ऑ
सुरेश मापारी हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत....

6 Oct 2021, 11:52 वाजता

नंदुरबार विजय निकाल संख्याबळ
गट

भाजप -  3
सेना - 1
काँग्रेस - ३
राष्ट्रवादी - 1
इतर - 00

6 Oct 2021, 11:48 वाजता

वाशिम- उकळीपेन जिल्हा परिषद गटातून शिवसेचे उमेदवार सुरेश मापारी विजयी
सुरेश मापारी हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत....

6 Oct 2021, 11:36 वाजता

पालघर - खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित पराभूत

6 Oct 2021, 11:22 वाजता

नंदूरबारमध्ये सुप्रिया गावित तर धुळ्यात धरती देवरे विजयी

6 Oct 2021, 11:21 वाजता

देगाव जिल्हा परिषद मध्ये वंचित बहुजन आघाडीचे राम गव्हाणकर विजयी

6 Oct 2021, 11:12 वाजता

पालघर जिल्हा परिषद  गट - नडोरे देवखोप शिवसेना उमेदवार निता पाटील विजयी

6 Oct 2021, 11:08 वाजता

आतापर्यंत विजयी/आघाडी 

झेडपी -
काँग्रेस 1 विजयी,
काँग्रेस 1 जागेवर आघाडी 
शेकाप 1 जागेवर विजयी