ZP Election Result 2021 LIVE Update : झेडपीचा रणसंग्राम, कोण मारणार बाजी?

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक निकाल आज

ZP Election Result 2021 LIVE Update : झेडपीचा रणसंग्राम, कोण मारणार बाजी?

मुंबई : ZP Election Result 2021 LIVE Update :जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वात जलद निकाल आपण  'झी 24 तास' आणि '24तासडॉटकॉम'वर पाहू शकता. 

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी राज्यात सहा जिल्हा परिषदात पोटनिवडणूक झाली. आज त्याचा निकाल लागणार आहे. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार, पालघर या सहा जिल्हा परिषदांसाठी काल मतदान झालं. पोटनिवडणुकीसाठी सुमारे 63 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं सहा जिल्हा परिषदांमध्ये 229 जागा रिक्त झाल्यात. रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येत आहेत. पोटनिवडणुकांच्या निकालांवर नागपूर, अकोला आणि वाशीम जिल्हा परिषदांच्या सत्तेचे भवितव्य ठरणार आहे. तर पालघरमधील निकालाने राजकीय चित्र मात्र बदलणार नाही.

 

6 Oct 2021, 10:30 वाजता

गोभणी जिल्हा परिषद गटामधून जनविकासच्या पूजा अमोल भुतेकर आघाडीवर

6 Oct 2021, 10:23 वाजता

धुळे जिल्ह्यात पहिला निकाल हा भाजपाच्या बाजूने जातानाचा कौल  

6 Oct 2021, 10:12 वाजता

नंदुरबार  मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात...

 भाजप विरुद्ध महा विकास आघाडीच्या सामना...

 भाजपची प्रतिष्ठा पणाला...

 अनेक घराणेशाहीतील उमेदवार निवडणूक रिंगणात

6 Oct 2021, 10:03 वाजता

धुळे जिल्ह्यातील सर्व ठिकाणी 4 ही तालुक्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू .....

धुळे आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये आधी गटांची होणार मतमोजणी....

 तर शिरपूर आणि साक्री  तालुक्यातील गणांची होणार मतमोजणीला...

प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात...

6 Oct 2021, 10:02 वाजता

अकोल्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरूवात होणार आहे काय चित्र संभाव्य राहणार याकडे साऱ्यांचं लक्ष 

6 Oct 2021, 09:59 वाजता

नागपूर- जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मतमोजणी...  काही क्षणातच सुरू होणार..

6 Oct 2021, 09:54 वाजता

- झेडपी, पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात
- ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने रिक्त जागांवर पोटनिवडणूक
- सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार?
- पोटनिवडणुकीचा वेगवान निकाल पाहा फक्त झी 24 तासवर