ZP Election Result 2021 LIVE Update : झेडपीचा रणसंग्राम, कोण मारणार बाजी?

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक निकाल आज

ZP Election Result 2021 LIVE Update : झेडपीचा रणसंग्राम, कोण मारणार बाजी?

मुंबई : ZP Election Result 2021 LIVE Update :जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वात जलद निकाल आपण  'झी 24 तास' आणि '24तासडॉटकॉम'वर पाहू शकता. 

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी राज्यात सहा जिल्हा परिषदात पोटनिवडणूक झाली. आज त्याचा निकाल लागणार आहे. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार, पालघर या सहा जिल्हा परिषदांसाठी काल मतदान झालं. पोटनिवडणुकीसाठी सुमारे 63 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं सहा जिल्हा परिषदांमध्ये 229 जागा रिक्त झाल्यात. रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येत आहेत. पोटनिवडणुकांच्या निकालांवर नागपूर, अकोला आणि वाशीम जिल्हा परिषदांच्या सत्तेचे भवितव्य ठरणार आहे. तर पालघरमधील निकालाने राजकीय चित्र मात्र बदलणार नाही.

 

6 Oct 2021, 11:01 वाजता

वाशिम काटा जि.प सर्कल मधून काँग्रेसच्या संध्या देशमुख विजयी 

6 Oct 2021, 11:00 वाजता

धुळे जिल्हा परिषदेच्या 15 गटांपैकी दोनचे निकाल जाहीर..
लेमकानी गटात भाजपच्या धरती देवरे  विजयी तर बोरकुंड गट शिवसेनेने बिनविरोध निवड

6 Oct 2021, 10:59 वाजता

अकोला : जिल्हा परिषदच्या देगाव आणि अंदूरा सर्कल मधून वंचित बहुजन आघाडीवर..
तेल्हारा तालुक्यातील मधून  हिवरखेड गणमधून वंचितचे अब्दुल आदिल
वाडी अदमपुर मधून अरविंद तिवाने विजयी
जिल्हा परिषद घुसरहुन वंचित चा उमेदवार विजयी

6 Oct 2021, 10:48 वाजता

अक्कलकुवा जिल्हा परिषद गटातील काँग्रेस उमेदवार विजयी 
नंदुरबार काँग्रेस उमेदवार रेहाणाबेन मक्रणी विजयी

6 Oct 2021, 10:45 वाजता

कापडणे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण गुलाबराव पाटील आघाडीवर ...
भाजपचे उमेदवार रामकृष्ण खलाने हे आहेत प्रमुख विरोधक

नागपूर : गुमथळा जी प सर्कल च्या पोट निवडणुकीत कांग्रेस चे दिनेश ढोले 1420 मतांनी आघाडी

6 Oct 2021, 10:44 वाजता

कापडणे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण गुलाबराव पाटील आघाडीवर ...
भाजपचे उमेदवार रामकृष्ण खलाने हे आहेत प्रमुख विरोधक

6 Oct 2021, 10:43 वाजता

साक्री तालुक्यातून कासारे गणातील जयस्वाल शकुंतला बाई शिवसेना आघाडीवर 
जैन महावीर भागचंद बैसाने गणात आघाडीवर शिवसेना

6 Oct 2021, 10:38 वाजता

जिल्हा परिषद शिवसेना एका जागेवर विजयी

शिवसेनेच्या उमेदवार विनया विकास पाटील 6200 मतांनी विजयी

6 Oct 2021, 10:33 वाजता

नंदुरबार म्हसावद गटात  काँग्रेसच्या हेमलता शितोळे 2924 मतांनी विजयी

6 Oct 2021, 10:31 वाजता

नागपूर :गुमथळा सर्कलमधून अनिल निधान पहिल्या फेरीत मागे, अनिल निधान भाजपचे
दवलामेटी पंचायत समिती मध्ये भाजपच्या ममता जैस्वाल विजयी