भाजपत प्रवेश करण्यासाठी 100 कोटींची ऑफर, राष्ट्रवादी आमदाराचा गौप्यस्फोट

100 कोटीचा खर्च देण्याचे देखील आमिष दिल्याचा गौप्यस्फोट 

Updated: Jan 23, 2021, 09:36 PM IST
भाजपत प्रवेश करण्यासाठी 100 कोटींची ऑफर, राष्ट्रवादी आमदाराचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्यात भाजप पक्षाचे सरकार असताना भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑफर असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. पुन्हा निवडून येण्यासाठी येणारा 100 कोटीचा खर्च देण्याचे देखील आमिष दिल्याचा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला आहे.

तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातुन माझ्याशी संपर्क केला असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. या प्रवेशानंतर तुम्हाला मंत्रीपद देतो असे सांगुन पोटनिवडणुकीत 100 कोटी खर्च करण्याची ऑफर ही भाजपने दिली असल्याचा धक्कादायक खुलासा आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. 

दरम्यान, याबाबत आपण शशिकांत शिंदेंकडून माहिती घेऊ. मात्र अनेकांना असे अनुभव आलेत, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.