close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शेतात आढळला तब्बल ११ फुटांचा अजगर

अॅनाकोंडा चित्रपट पहिला असेल आपण, त्यातील भलामोठा अजगर आणि थरकाप उडवून देणाऱ्या त्याच्या हालचाली. 

Updated: Aug 14, 2017, 06:57 PM IST
शेतात आढळला तब्बल ११ फुटांचा अजगर

प्रशांत परदेशी , शिरपूर , धुळे : अॅनाकोंडा चित्रपट पहिला असेल आपण, त्यातील भलामोठा अजगर आणि थरकाप उडवून देणाऱ्या त्याच्या हालचाली. काहीसा असाच प्रत्यक्ष अनुभव घेतला तो धुळे जिल्यातील शिरपूर तालुक्यातील बभळाज या गावाच्या पंचकृषीतील ग्रामस्थांनी. बभळाज गावातील एका शेतात आढळलेल्या या  भल्या मोठ्या अजगराची कैद आणि सुटकेचा हा चित्तथरारक प्रवास

गाव - धुळे जिल्ह्यातील बभळाज शिवार, वेळ सायंकाळची , घटनास्थळ सरपंच यांचे केळीचे शेत, या शेतात तब्बल ११ फुट लांबीचा आणि दहा किलो वजन असलेला अजगर असल्याची वार्ता वायू वेगाने पसरली. गावातील नव्हे तर संपूर्ण पंचकृषीतील लोकांनी याची देही याची डोळा भला मोठा अजगर पाहण्यासाठी तौबा गर्दी केली. 

या अजगराचे अवसान दातखिळी बसेल असं होत. भल्या मोठ्या या अजगरा जवळ जाण्याची हिम्मत कोणी करत नव्हतं. त्यामळे परिसरातील विद्युत विभागात कार्यरत असलेले सर्पमित्र संजय भावसार याना बोलाविण्यात आलं. त्यांनी हा महाकाय अजगर पाहिल्यावर आपत्ती व्यवस्थापन विभाग, वन विभाग, पोलीस आणि काही सर्पमित्रांना कळवलं. रीतसर परवानगी घेऊन भावसार यांनी आपल्या इतर पाच सर्पमित्रांच्या मदतीने हा अजगर पकडला. स्थानिक ग्रामस्थांच्या नजर कैदेत सापडलेल्या या अजगराची सुटका भावसार यांनी केली. 

या अजगराला पकडताना त्यांच्या ताकदीचा प्रत्यक्ष अनुभव सर्पमित्र आणि उपस्थित घेत होते. पाच जणांना न जुमानणार हा अजगर जेव्हा सर्पमित्रांच्या पकडीतून सुटत होता त्यावेळी घाबरलेल्या उपस्थितांच्या किंकाळ्या अजगराच्या बळाची प्रचिती देत होत्या. अखेर भावसार यांनी या अजगराला स्थानिकांच्या नजर कैदेतून सोडवत वन विभागाच्या मदतीने अजगराची मुक्तता केलील 

या अजगराला शिरपूर तालुक्यातील सातपुड्यातील जंगलात सोडण्यात आलं आहे. अजगर जंगलात मुक्त करण्यात आला असला तरी त्याच्या भीती आणि चर्चा अजून लोकांच्या डोळ्यात आणि ओठावर कायम आहे.