ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या 12 वर

कोरोना व्हायरसचे आणखी दोन रुग्ण ठाण्यात आढळले आहेत. हे दोन रुग्ण वर्तकनगर भागात आढळले असून पती पत्नीला ही लागण झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 12 झाली आहे. त्यामुळे पालिकेने ठाणेकरांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.

Updated: Mar 31, 2020, 06:05 PM IST
ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या 12 वर title=

ठाणे : कोरोना व्हायरसचे आणखी दोन रुग्ण ठाण्यात आढळले आहेत. हे दोन रुग्ण वर्तकनगर भागात आढळले असून पती पत्नीला ही लागण झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 12 झाली आहे. त्यामुळे पालिकेने ठाणेकरांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.

ठाण्यात मागील काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. पहिला रुग्ण ठाण्यात आढळल्यानंतर तब्बल दोन आठवडय़ांनी रुग्णांच्या संख्येत दिवसाला वाढ होतांना दिसत आहे. कळव्यातील 5 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर याच भागातील आणखी दोघांना याची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पती पत्नीचा समावेश आहे. हे दोघे 18 मार्च रोजी युके वरुन आले होते. त्यानंतर 21 मार्च रोजी त्यांना त्रस होऊ लागला होता. त्यानंतर 23 मार्च रोजी त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 

वर्तकनगर भागातील अन्य एका दामप्त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हे दामप्त्य 15 मार्च रोजी युएस वरुन आले होते. 21 मार्च रोजी त्यांना त्रस होऊ लागल्याने ते खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर आता त्यांचाही रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. त्यामुळे आता शहरातील रुग्णांची संख्या 12 झाली असल्याची माहिती पालिकेने दिली.