राज्यात नवे १६ पासपोर्ट सेवा केंद्र

राज्यात आणखी १६ पासपोर्ट सेवा केंद्रं सुरू करण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयानं घेतलाय.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 9, 2017, 10:46 AM IST
राज्यात नवे १६ पासपोर्ट सेवा केंद्र  title=

मुंबई : राज्यात आणखी १६ पासपोर्ट सेवा केंद्रं सुरू करण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयानं घेतलाय.

या निर्णयामुळं राज्यातील जनतेला पासपोर्ट काढणं सहज आणि सुलभ होणाराय. यामुळं राज्यातील पासपोर्ट केंद्राची संख्या २७ वर पोहोचणार आहे. येत्या मार्च २०१८ पर्यंत २५१ नवी पासपोर्ट केंद्रं सुरू करण्यात येणार असून, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या १६ केंद्रांचा समावेश आहे. 

देशातील नागरिकांना सुलभ पासपोर्ट सेवा मिळावी या उद्देशाने नवीन पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या मार्च २०१८ पर्यंत देशात २५१ केंद्रे सुरू होणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात एकूण २० पासपोर्ट केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील ४ पासपोर्ट केंद्रे सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर व पिंपरी चिंचवड येथे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित १६ पासपोर्ट केंद्रे लवकरच कार्यान्वित होतील अशी माहिती ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली आहे.

ही असतील १६ नवीन पासपोर्ट केंद्रे

महाराष्ट्रात सुरू करण्यात येत असलेल्या १६ पासपोर्ट केंद्रांमध्ये सिंधुदुर्ग, वर्धा, जालना, लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सांगली, बीड, मुंबई नॉर्थ सेन्ट्रल, मुंबई उत्तर-मध्य, घाटकोपर, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड व जळगाव या जिल्यांचा समावेश आहे. या १६ नवीन पासपोर्ट केंद्रांमुळे राज्यात पासपोर्ट केंद्रांची संख्या २७ होणार आहे.