ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत; नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग

ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत पूर्ण होणार आहे. नॅशनल पार्कच्या जंगलातून भुयारी मार्ग बांधला जात आहे. हा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 27, 2024, 08:55 PM IST
 ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत; नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग  title=

Thane Borivali Tunnel : भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग आपल्या महाराष्ट्रात बनत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात देशातील सर्वात लांब आणि मोठा भुयारी मार्ग बांधला जात आहे. मुंबईच्या  नॅशनल पार्कच्या जंगलातून हा भुयारी मार्ग जात आहे. या भुयारी मार्गामुळे  ठाणे ते बोरिवली हा प्रवास आता फक्त 12 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी  एमएमआरडीएने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) कडून कर्ज घेतले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गाची पायाभरणी करण्यात आली. त्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवासात 1 तासांची बचत होणार आहे.. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचा हा 16 हजार 600 कोटींचा प्रकल्प आहे. त्यामुळे थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गामुळे घोडबंदर रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होणार आहे. 

हे देखील वाचा... पृथ्वीला हादरवणारा जगातील सर्वात शक्तीशाली प्रकल्प; याची पावर पाहून NASA चे संशोधकही घाबरले

 

भारतातील हा सर्वात लांब आणि मोठा शहरी भुयारी मार्ग आहे. प्रकल्पाची एकूण लांबी 11.8 किमी आहे, त्यापैकी 10.25 किमीचा बोगदा आहे. दोन्ही बोगद्यांमध्ये दोन मार्गिका आणि एक आपत्कालीन मार्गिका असणार आहे.. त्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास विनाथांबा आणि सिग्नलरहित होणार आहे.. 2028 पर्यंत या प्रकल्प पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. 

ठाणे बोरिवली भुयारी मार्गाबाबत मोठी अपडेट

ठाणे बोरिवली भुयारी मार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.   मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नऊ प्रकल्पांच्या निधीबाबत महत्वाचा निर्णय झाला आहे.  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अर्थात एमएमआरडीएने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) कडून 31,673.79 कोटींचे कर्ज घेतले आहे.  मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील नऊ प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आर्थिक निधी उभारण्याकरिता हे कर्ज घेण्यात आले आहे. 31,673.79 कोटींच्या कर्जातील सर्वाधिक निधी  ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी दिला जाणार आहे. अतिरिक्त निधी इतर आठ प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी खर्च केला जाणार आहे.

एमएमआरडीएचे महत्वाचे प्रकल्प

ठाणे कोस्टल रोडचे बांधकाम (टप्पा I)
घाटकोपर ते ठाणे पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार 
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ते काटई नाका पर्यंत उन्नत रस्त्याचे बांधकाम
खाडी पुलाचे बांधकाम आणि कोलशेत ठाणे ते खारबाव, भिवंडीपर्यंत जाण्यासाठी रस्ते
कासारवडवली, ठाणे आणि खरबाव दरम्यान खाडी पुलाचे बांधकाम
वालधुनी नदीवरील रेल्वे ओव्हरब्रिजसह कल्याण मुरबाड रोड (पाम्स वॉटर रिसॉर्ट) ते बदलापूर रोड (जगदीश डेअरी) पर्यंत उन्नत रस्त्याचे बांधकाम
ठाणे शहरातील आनंद नगर ते साकेत या पूर्व द्रुतगती महामार्गावर उन्नत रस्त्याचे बांधकाम
गायमुख ते पायेगाव या खाडी पुलाचे बांधकाम.