close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नागपुरात गेल्या १२ तासात २ जणांची हत्या

बाजार सुरु असताना अनेकांच्या देखत हत्या

Updated: Jul 24, 2019, 12:49 PM IST
नागपुरात गेल्या १२ तासात २ जणांची हत्या

नागपूर : क्राईम सिटी अशी ओळख होत चाललेल्या नागपुरात गेल्या १२ तासांत हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी बाजार परिसरात फळ-भाजी दलालाची बाजारात हत्या करण्यात आली. सुभाष मोहुर्ले असं मयताचं नाव आहे. सुभाष मंगळवारी संध्याकाळी बाजारात आला असताना मारेकऱ्यांनी सत्तूर आणि रॉडनं त्याच्यावर हल्ला केला. 

बाजार सुरु असताना अनेकांच्या देखत झालेल्या हत्येच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. उधारीच्या पैशाच्या वादातून सुभाषची हत्या झाल्याची सांगण्यात येत आहे. 

दुसरी घटना रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. त्याठिकाणी एका तरुणाची हत्या करण्यात आली. राजीव नगर परिसरात संदीप बावनकर नावाच्या इसमाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे.