नागपूर : आज सातव्या दिवसाच्या गणपतीचं विसर्जन सुरू असून नागपूरच्या गायत्री नगर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे विहिरीत तीन जण पडल्याची माहिती समोर आली आहे.
गायत्री नगरच्या मानकापूर परिसरात हे तीन जण विहिरीत पडले असून घटनास्थळी पोलीस पथक पोहोचलं आहे. या दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.
गुरूवारी दुपारी ही घटना घडली. विहीर खचल्यामुळे हे तिघे विहिरीत पडल्याचे समजते. तर त्यातील दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र, एक अडीच वर्षाचा मुलगा अजूनही आत अडकून पडला आहे. अंकुश चौधरी असे या मुलाचे नाव आहे. तर या मुलाची आई सुरेखा चौधरी आणि मावशी मंदा महाजन यांनी सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. सुरेखा चौधरी या अकुंशच्या आई आणि मंदा महाजन या मावशी आहेत.
विहीर सतत खचत असल्याने अंकुश ढिगा-याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे.
(Image Credit: YouTube)