२० वर्षीय कॉलेज तरुणीचं दिवसाढवळ्या अपहरण

कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड मध्ये एका २० वर्षीय कॉलेज तरुणीचं दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आलं.

Updated: Jan 23, 2020, 07:48 PM IST
२० वर्षीय कॉलेज तरुणीचं दिवसाढवळ्या अपहरण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड मध्ये एका २० वर्षीय कॉलेज तरुणीचं दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आलं.. या घटनेमुळं कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणी कॉलेजमधून बाहेर पडत असतानाच MH 02 AU 9109 क्रमांकाच्या स्वीट गाडीमधून आलेल्या धीरज उर्फ गुंड्या सावर्डेकर आणि विजय फराकटे या दोघा गुंडांनी तिचं अपहरण केलं. 

तरुणीचा आरडाओरडा ऐकल्यानंतर कॉलेज परिसरातल्या काही तरुणांनी गाडीचा पाठलाग केला. पण तोपर्यंत गाडी पुढं निघून गेली. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.