संभाजीनगरच्या सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा; संचालक मंडळासह 50 जणांवर गुन्हे दाखल

संभाजीनगरमध्ये 200 कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत हा घोटाळा झालाय. 

Updated: Jul 11, 2023, 11:43 PM IST
संभाजीनगरच्या सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा; संचालक मंडळासह 50 जणांवर गुन्हे दाखल title=

Chhatrapati Sambhajinagar Crime News: संभाजी नगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. संचालक मंडळासह 50 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकारामुळे संभाजीनगरमध्ये एक खळबळ उडाली आहे. संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे शेकडो सदस्य आहेत. यामुळे पतसंस्थेच्या सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.    

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या 200 कोटींचा घोटाळा प्रकरणी अध्यक्ष, संचालक मंडळासह सहा जणांविरुद्ध सिडको ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील एक घोटाळा 91 कोटींचा असून दुसरा गुन्हा 101 कोटींचा आहे. सहकार विभागाच्या लेखा परीक्षण अहवालात कर्जप्रकरणातील हा सगळं घोटाळा समोर आला आहे.

असा झाला घोटाळा उघड

मार्च 2019 अखेरीस आलेल्या कर्ज प्रकरणातील अपूर्ण स्थितीतले अर्ज पतसंस्थेने स्विकारले आहेत.  कर्ज वाटपाचे निकषाचे जाणीवपुर्वक उल्लंघन करुन विनातारण आणि कमी तारण स्विकारुन गंभीर त्रुटी असलेले अर्जाचे आधारे कर्ज वितरीत केले असा ठपका ठेवण्यात आला आहे. वितरीत केलेल्या कर्जास संचालक मंडळ सभेने देखील गंभीर त्रुटीकडे जाणीवपुर्वक डोळेझाक करुन ठेवीदारांनी संस्थेत ठेवलेल्या ठेव रकमेतून मोठया प्रमाणात कर्जाचे वितरण करण्याच्या कृतीस मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता दोन वेगवेगळे गुन्हे सिडको पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

देशभरात 100 हून जास्त गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंडाला कर्नाटकमधून अटक

देशभरात शंभरपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेला मोक्कामधला आरोपीला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी कर्नाटक राज्यातील धारवाडमधून अटक केली आहे. कासीम मुख्तार इराणी उर्फ तल्लफ असे या आरोपीचे नाव आहे. त्याला पकडण्यासाठी गेलेले तीन पोलीस जखमी झालेत. या आरोपीकडून एक पिस्तूल, पाच महागड्या मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. 
ठाणे जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात फरार असलेल्या कासीम इराणी याच्यावर देशभरात 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे मोटारसायकलीवरून कासीम महिलांच्या गळ्यातून दागिने हिसकावून पळण्यात एक्सपर्ट आहे. 2022 मध्ये आंबिवली इराणी वस्तीत राहणारा जाफर इराणी नावाच्या तरुणावर कासीम याने प्राणघातक हल्ला केला होता. जाफर हा पोलिसांचा खबरी आहे. इराणी चोरट्याची माहिती पोलिसांना देतो, या संशयातून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हल्ला करुन कासीम हा फरार झाला होता. कासीम हा कर्नाटक येथील धारवाडमध्ये लपून बसला आहे. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या विशेषतः पथकाने धारवाड गाठले.यासाठी कर्नाटक धारवाड पोलिसांची त्यांनी मदत घेतली.कासीमला पकडण्यासाठी गेलेले धारवाडचे एक आणि कल्याणचे दोन पोलिस जखमी झाले. अखेर त्यांला अटक करण्यात आले आहे. पूढील तपास कल्याण खडकपाडा पोलिस करीत आहेत.