२४ गाव २४ बातम्या - ११ एप्रिल २०१८

२४ गावातील निवडक २४ घडामोडी पाहा एका क्लिक वर

Updated: Apr 11, 2018, 07:38 PM IST

हेडलाईन्स, ११ एप्रिल २०१८, झी २४ तास 1) कोकणात नाणार प्रकल्प होणार, शिवसेनेला अंधारात ठेवून केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा करार, सौदी अर्माको कंपनीबरोबर दीड लाख कोटींचा करार 
2) यवतमाळमधल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणाला नवं वळण.,मृतदेह रुग्णालयात सोडून कुटुंब गायब... मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची धावपळ.... 
3) सरकारी हरभरा खरेदी केंद्र सुरु न झाल्यामुळं लातूर जिल्ह्यातील शेतक-यावर मुलीचं लग्न पुढं ढकलण्याची वेळ तर तूर खरेदीही बनली सरकारची डोकेदुखी... 70 लाख क्विंटल तूर पडून 
4) भुजबळांच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मालमत्तेवर नाशिक मर्चंट्स सहकारी बँकेची टाच... दोन महिन्यात कर्जाची परतफेड न केल्यास मालमत्तेचा लिलाव... 
5) औरंगाबादमध्ये कॉपी करताना पकडलं म्हणून उडी मारलेली विद्यार्थ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू, मृत विद्यार्थ्यांच्या पालकांची कॉलेजविरोधात तक्रार 
6) संसदेचे कामकाज होत नव्हतं तेव्हाच उपोषण का केलं नाही, पुण्यातील हल्लाबोल मोर्चात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल, काम न होण्याला सरकार जबाबदार असल्याची टीका 
7) शिवाजी पार्कमधील पुतळा नुतनीकरण वादात मनसेची उडी... पीडब्ल्यूडी कार्यकारी अभियंत्याची भेटीसाठी टाळाटाळ... नाराज मनसेनं अभियंत्याची खुर्ची उचलून शिवाजी पार्कमध्ये ठेवली
8) उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्यासाठी मोदींनी स्वतः पुढाकार घ्यावा, रामदास आठवलेंची भूमिका, युती झाली तर दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यास आठवले इच्छुक... 
9) ग्रामस्वराज्य अभियानाबाबत पंतप्रधान मोदींनी साधला भाजप लोकप्रतिनिधींशी संवाद... आमदार खासदारांची संवाद साधण्यासाठी कसरत... उद्याच्या उपोषणासाठी सज्ज राहण्याचा संदेश...
10) दलित संघटनांच्या ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेतला तर भाजपची साथ सोडेन....झी 24 तासला एक्स्लुझिव्ह मुलाखतील केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची खुली ऑफर..... 
11) बेशिस्त वर्तन आणि उद्धट वागणाऱ्या पोलिसांना सुधारण्याचा प्रयत्न.... पुणे ग्रामीण पोलिसांचा अनोखा उपक्रम...पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांचा पुढाकार...