मांजरा नदीत आढळला २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह

लातूर-अंबेजोगाई महामार्गावरील महापूरच्या मांजरा नदीत पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह आढळून आला. एका २५ वर्षीय तरुणाचा हा मृतदेह होता. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 21, 2017, 03:59 PM IST
मांजरा नदीत आढळला २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह title=

लातूर : लातूर-अंबेजोगाई महामार्गावरील महापूरच्या मांजरा नदीत पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह आढळून आला. एका २५ वर्षीय तरुणाचा हा मृतदेह होता. 

एका शेतकऱ्याला हा मृतदेह दिसल्यानंतर रेणापूर पोलिसांना कळविण्यात आले.  ज्या ठिकाणाहून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिथे कमरेएवढेच पाणी होतं. त्यामुळे मृतदेह तरंगत आल्याची शक्यता कमी आहे. 

त्यामुळे या तरुणाचा घातपात करून अथवा खून करून हा मृतदेह पुलावरून नदीपात्रात टाकल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. 

सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.