मुंबई : यंदा ऊसाचा गाळप हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असून ९.५० टक्के उताऱ्यासाठी २,५५० रुपये प्रति मेट्रिक टन ‘एफआरपी’ देण्याचे निर्णय आज मुंबईत मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
बाहेरच्या राज्यातील कारखान्यांना ऊस देण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यंदाच्या गाळाप हंगामासाठी अंदाजे ७२२ लाख टन ऊस उपलब्ध होणार असून ७३.४ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९४ टक्के वाढ अपेक्षित आहे.
यंदा राज्यात १७० कारखाने ऊसाचे गाळप करणार आहेत. नियमीतपणे हप्ते भरणा-या तसेच दर नियंत्रण समितीचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या कारखान्यांना ‘एफआरपी’पेक्षा जास्त दर देण्याविषयीचे अधिकार साखर आयुक्तांना देण्याचा निर्णयही मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला.