Fact Check | राज्यात 'कृषी मित्र'पदाच्या 28 हजार जागा? काय खरं काय खोटं?

 व्हायरल मेसेजमध्ये  28 हजार जागा तातडीनं भरायच्या आहेत, असा दावा करण्यात आला आहे. 

Updated: Jul 16, 2021, 10:04 PM IST
Fact Check | राज्यात 'कृषी मित्र'पदाच्या 28 हजार जागा? काय खरं काय खोटं?  title=

विशाल करोळे, झी 24 तास, औरंगाबाद : सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होतोय. व्हायरल मेसेजमध्ये, राज्यातील सगळ्याच ग्रामपंचायतीमध्ये 28 हजार जागा तातडीनं भरायच्या आहेत. कृषीमित्र पदासाठी या जागा आहेत. यासाठी तातडीनं अर्ज करा, असं लिहलंय. मात्र हा व्हायरल होणारा मेसेज फेक आहे. सरकारनं कुठलीही अशी जाहीरात काढली नाहीये. (28 thousand vacancies for Krishi Mitra post in maharashtra grampanchayat what is the truth this viral advertisement)

सोशल मीडियावर खास करून ग्रामीण भागात या जाहिरातीनं धुमाकुळ घातला आहे.  यात ग्रामपंचायत स्तरावर 28 हजार जागा भरण्यात येईल असं सांगण्यात आलंय. 12 वी पास असलेला कुठलाही उमेदवार याला अर्ज करू शकतो. तसेच 9 हजारांच्या आसपास पगारही देण्यात येईल असं सांगण्यात आलंय.  या जाहिरातीमुळं अनेक ग्रामपंचायतीत मुलांनी चौकशी केली. 

औरंगाबादच्या बीडकीन, सिल्लोड या ठिकाणी उमेदवारांनी चौकशी केली. त्यामुळं कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा या जाहीरीतीची शहानिशा केलीय. वरिष्ठ कार्यालयाला याबाबत विचारना केल्यावर अशी कुठलीही जाहिरात सरकारनं काढली नसल्याचं स्पष्ट झालं. तरूणांची सातत्यानं विचारणा होत असल्यानं अखेर कृषी अधिकाऱ्यांनी ही जाहीरात सरकारची नाही, त्याला बळी पडू नका असे आवाहन केले आहे.

विशेष म्हणजे प्रथम दर्शनी ही जाहीरात सरकारी जाहिराती सारखी दिसत असली तरी त्यात शासनाचे कुठेही नाव नाही.  शासनाच्या मंडळाकडून प्रोत्साहित केलेल्या प्रॉडक्सटच्या मार्केटींगसाठीची ही जाहिरात आहे. याच्या तळाशी शासनाच्या कुठल्याही विभागाचे नाव नाही. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याचीही स्वाक्षरी नाहीये, जी एरव्ही सरकारी जाहीरातीत असते.  त्यामुळं ही जाहीरात सरकारी नाही, कुठल्या खाजही कंपनीची असेल वा फसवी असेल असं स्पष्ट  झालंय.  

या फेक भरतीच्या मेसेजमुळेतरूणांची फसवणूक होत आहे.  खोट्या आशेला तरूण लागत असल्याचं तरुणांचे म्हणणे आहे. राज्यभर ही जाहिरात व्हायरल झाली आहे.  त्यामुळं यावर कारवाई करावी, अशीही मागणी बेरोजगार तरूण करतायेत. 

सध्या अनेक अशा जाहीरातींमधून बेरोजगारांची दिशाभूल होतेय. सरकारी दाखवून अनेक ठिकाणी पैसै उकळण्याचे सुद्धा प्रकार घडत आहेत. त्यामुळं शहानिशा करूनच अशा जाहिरातींना प्रतिदास द्यावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेय. ही जाहीरात शासनाच्या ग्रामविकास वा कृषी विभागाकडून नाहीये. याची पुर्ण खात्री आम्ही करून घेतली आहे. त्यामुळं बेरोजगारांने असल्या फसव्या जाहीरातीपासून सावधान रहावे.