बीड येथे ३०० शेतकरी कुटुंबांचा भाजीपाला विक्रीवर बहिष्कार

बीड शहराजवळच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीला जाणे बंद केले आहे.

Updated: Apr 7, 2020, 12:22 PM IST
बीड येथे ३०० शेतकरी कुटुंबांचा भाजीपाला विक्रीवर बहिष्कार title=
प्रतिकात्मक छाया

बीड : शहराजवळच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीला जाणं बंद केले. भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी मारहाण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला. मात्र यामुळे शेतकऱ्यांवर हा भाजीपाला जनावरांना घालण्याची वेळ आली आहे. नाळवंडी गावातील तब्बल ३०० शेतकरी कुटुंबांनी भाजीपाला विक्रीवर बहिष्कार घालत विक्री बंद केली. 

नाळवंडी गावातून दररोज पाच टन भाजीपाला बीड शहरात येतो. संचार बंदीच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी  शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र प्रशासनाकडून बेदम मारहाण करण्यात आल्यामुळे या पुढे भाजी विक्री करणार नसल्याचा निर्णय इथल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे. तसेच बीड शहरात भाजीपाला पाठवणार नाही, असा इशाराही संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील शेतकरी हा दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान यामुळे अडचणीत आहे. असे असताना आता आलेला माल शेतकरी जनावरांना घालत आहे. त्यामुळे शेकऱ्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी रब्बी हंगाम गेला या वर्षी खरीप हंगाम गेला. सतत पडणारा दुष्काळ, वाढती महागाई , अवकाळी पाऊस  आणि पिकलेल्या मालाला भाव मिळत नाही , या वर्षीची रब्बी हंगामातील पिके,भाजीपाला , फळपिके अवकाळी पावसामुळे आणि संचार बंदी मुळे जागेवरच उध्वस्त होत असल्याने हा माल गाव संस्था मार्फत संचार बंदीच्या नियमानुसार रब्बी हंगामातील माल ऑनलाईन करून खरेदी करावा अशी मागणी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.

लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांसमोरही संकटे उभे टाकली आहेत. फळबाग शेतकरीही मोठया अडचणीत सापडले आहेत. लॉकडाउनमुळे केळीची मागणी घटली आणि एका शेतकऱ्यासमोर आपल्या लेकीच्या लग्नाचा बिकट प्रश्न उभा टाकला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील माधवराव वघांडगे. चोरंबा येथे त्यांची बागायती शेती आहे. अर्धापूर तालुक्यातील केळी देशभरात प्रसिद्ध आहे. यंदा वघांडंगे यांनीही आपल्या चार एकर शेतात केळीच्या पाच हजार रोपांची लागवड केली. केळी जोमाने वाढली. आता केळी काढणीला आली आहे. मात्र, लॉकलाऊनमुळे अडचण निर्माण झाली आहे.