मस्तच ! मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या 3 तासांत

Greenfield-Konkan Coastal Expressway : नव्या कोकण महामार्गासंदर्भातली ही बातमी. मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येईल. 

Updated: Sep 7, 2021, 11:41 AM IST
मस्तच ! मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या 3 तासांत
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : Greenfield-Konkan Coastal Expressway : नव्या कोकण महामार्गासंदर्भातली ही बातमी. मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येईल, अशा मुंबई कोकण ईवेचा प्रस्ताव आहे. ग्रीन फिल्ड कोकण एक्स्प्रेसवे असे त्याचे नाव आहे. त्याचा सर्व्हे ड्रोनच्या माध्यमातून होणार आहे. 70 हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रोजेक्टसाठी अपेक्षित आहे. 

दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरु आहे. मात्र, अनेक ठिकाणी ते रखडलेले आहे. या कामाला अद्याप म्हणावा तसा वेग आलेला नाही. आता नव्या मार्गाची चाचपणी करण्यात येत आहे. या सागरी मार्गालगचच्या हायवेच्या कामाला वेग आला असून त्याचे ग्रीन फील्ड कोकण एक्स्प्रेसवेचा ड्रोन सर्व्हे होणार आहे. MSRDCच्या माध्यमातून हा 400 किमीचा ग्रीनफिल्ड-कोकण कोस्टल एक्सप्रेस वेचे नियोजन करण्यात येत आहे. हा महामार्ग रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार आहे. या नव्या मार्गामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

मस्तच ! मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या 3 तासांत

मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर केवळ तीन तासांत पार करता येणार आहे. अशा मुंबई कोकण एक्स्प्रेस वेचा प्रस्ताव आहे. 'ग्रीन फिल्ड कोकण एक्स्प्रेस वे' असं त्याचे नाव आहे. 70 हजार कोटींचा खर्च या प्रोजेक्टसाठी अपेक्षित आहे. तसेच 4 हजार हेक्टर जमिनीची यासाठी गरज आहे. 

उरणच्या चिर्ले गावातून सुरू होणारा हा प्रकल्प सिंधुदुर्गाच्या पत्रादेवीपर्यंत असणार आहे. तब्बल 400 किमीचा हा मार्ग आहे. सहा वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे. हा मार्ग झाल्यानंतर मुंबई ते सिंधुदुर्गाचा प्रवासाचा अर्धा वेळ वाचणार आहे.