उसाच्या शेतातून तब्बल 5 टन गांजा जप्त

एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याने परिसरासह आसपासच्या भागात खळबळ उडाली आहे. 

Updated: Aug 29, 2021, 07:27 PM IST
उसाच्या शेतातून तब्बल 5 टन गांजा जप्त

लैलेश बरगजे, झी 24 तास, अहमदनगर | जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात पोलिसांनी चक्क उसाच्या शेतातून 5 टन गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत ही तब्बल 50 लाख रुपये इतकी आहे. गांजा जप्त करण्यासह पोलिसांनी 2 महिलांनाही ताब्यात घेतलंय. (5 tonnes of ganja worth rs 50 lakh seized field in  pathardi ahmednagar)

पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी शिवारात ऊसाच्या शेतात गांजा ठेवण्यात आला होता. पोलिसांना शेतात गांजा लपवल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे आणि पाथर्डी पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये सोनई पोलिस स्टेशन आणि शनी शिंगणापूर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी देखील मदत केली. याशिवाय या गांजाची राखण करणाऱ्या 2 महिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सुगंधित सुपारी, गुटखा तसेच गांजा यावर राज्यामध्ये बंदी घातलेली असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याने परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. या गांजाच्या विक्रीमागे मोठी टोळी तर कार्यरत आहे का याचा तपास पोलिस करत आहेत.