नांदेड : महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात बरड गाव आहे. सुमारे 15 हजार लोकसंख्या असलेलं हे गाव. गावात 8 मंदिरे, 2 बौद्ध विहार, 1 जैन मंदिर आणि 1 मशीद आहे.
बरड गावातील सर्वच धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर... लाऊडस्पीकर स्पर्धेमुळे गावातील वातावरण बिघडण्याची भीती होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली.
ग्रामपंचायतीच्या या बैठकीत सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांवर असलेले लाऊडस्पीकर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सर्व धर्मच्या प्रमुख पुढार्यांनी पाठिंबा दिला. याचे कारण म्हणजे गावात होणारे ध्वनिप्रदूषण.
सततच्या या लाऊडस्पीकरमुळे गावात दररोज ध्वनिप्रदूषण होत होते. याचा गावातील शाळा आणि वृद्ध लोकांना त्रास होत होता. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळांचे लाऊडस्पीकर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्वात आधी मंदिरात चालणारे आठवड्याचे लाऊडस्पीकर काढण्यात आले. मग मशीद, बौद्ध मठ या सर्वांचे लाऊडस्पीकर काढले गेले. जानेवारी 2018 मध्ये हा निर्णय घेतला. त्यांनतर आता 5 वर्ष उलटली तरी या गावात पुन्हा कोणत्याही धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यात आले नाहीत.